ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय
भाजपाचा पहिला विजय, निवडणुकीआधीच फडकवला विजयाचा झेंडा…

सोलापूरच्या अनगर पंचायतीत भाजपच्या 17 पैकी 17 सदस्यांच्या जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे भाजपकडून जल्लोषाला सुरुवात करण्यात येत आहे.
माजी आमदार राजन पाटील यांचे दोन्ही पुत्र बाळराजे आणि अजिंक्यराणा पाटील यांनी फटाके फोडत जल्लोष केला आहे.
हा या निवडणुकीतील भाजपचा पहिला विजय आहे.
भाजप नेते, माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वखालील पॅनलचे 17 अर्ज दाखल झाले आहेत, मात्र विरोधी बाजून एकही अर्ज न आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.
17 सदस्यांच्या जागासाठी केवळ 17 अर्ज दाखल झाल्याने जवळपास बिनविरोध निवड झाल्याने जल्लोषाला सुरुवात झाली आहे.
मात्र नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील विरुद्ध राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून उज्वला थिटे यांचा थेट सामना होणार आहे.











