Video: छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह, दूरवर आगीच्या ज्वाळा अन्…; दिल्ली स्फोटातील अंगावर काटा आणणारे व्हिडिओ…

दिल्ली येथील लाल किल्ला परिसरात स्फोट झाल्याची मोठी घटना घडली आहे. लाल किल्लाजवळील मेट्रो स्टेशनजवळ एका गाडीत हा स्फोट झाला असून यामध्ये आतापर्यंत ८ ते ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
व्हिडिओ येथे पहा !
तर २४ जण जखमी झाले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या स्फोटामुळे आग लागली आणि जवळील तीन ते चार वाहनांचे नुकसान झाले.
व्हिडिओ 🖥️न्युज येथे पहा !
दिल्लीतील या भीषण स्फोटामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर दिल्लीसह मुंबईला अलर्ट दिला असून मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. दरम्यान, या घटनेचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यामध्ये रस्त्यावर धुराचे लोट पसरले असून अनेक वाहनांचे नुकसान झाल्याचे दिसत आहे.
व्हिडिओ येथे पहा !
व्हिडिओमध्ये लोक ओरडत आणि घटनेचे चित्रीकरण करताना दिसत आहेत. ज्या कारमध्ये स्फोट झाला ती पूर्णपणे आगीत जळून खाक झाली आहे. त्याचबरोबर अनेक लोक आगीत अडकले असून जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
लाल किल्ल्याजवळील स्फोट
स्फोटामुळे वाहतूक कोंडी झाली आणि परिसरात घबराट पसरली. लोकांचा आरडाओरडा सुरु असून अनेकजण एकमेकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देत आहेत. व्हिडिओमध्ये संपूर्ण रस्त्यावर धुराचे लोट पसरले आहेत.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि सहा कॅट गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत. तथापि जखमींना रुग्णालयात दाखल केले असून पोलीस सध्या स्फोटाचे कारण तपासत आहेत.











