क्राईम

पठ्ठ्याचा भलताच कारनामा, महिला भाडेकरूच्या बाथरूमच्या ब्लबमध्ये लपवला कॅमेरा…नंतर जे घडलं


घरमालकाने चक्क महिला भाडेकरूच्या बाथरूमच्या ब्लबमध्ये कॅमेरा लपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हैदराबादच्या वेगलराव नगर भागात ही घटना घडली आहे. याप्रकरणी आता घरमालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे.

तसेच ज्या इलेट्रीशनने हा कॅमेरा फिट केला, त्याचा शोधदेखील घेतला जातो आहे. अशोक यादव असं आरोपी घरमालकाचं नाव आहे. भाडेकरुच्या पत्नीला आंघोळ करताना बघता यावं म्हणून हा कॅमेरा लावल्याचं पुढे आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी कंपनीत काम करणारी २३ महिला विवाहित महिला तिच्या पतीसह अशोक यादव यांच्या घरी भाड्याने राहते. गेल्या ४ ऑक्टोबर रोजी महिलेने बाथरुमधील लाईट खराब झाल्याची तक्रारी घरमालकाकडे केली होती. त्यानंतर घरमालकाने इलेक्ट्रीशिनला बोलवून तिथे नवीन होल्डर आणि लाईट बसवून घेतला. मात्र, याच होल्डरमध्ये त्याने कॅमेराही फीट केला.

अशातच १३ ऑक्टोबर रोजी महिलेच्या पतीची नजर या लाईटवर केली. त्यावेळी एक नट ढिला असल्याचे त्याच्या लक्षात आलं. त्याने तो नट फिट करणयाचा प्रयत्न केला. मात्र, तो नट लागत नसल्याने त्याला संपूर्ण प्रकार संशयास्पद वाटला. त्यामुळे त्याने होल्डर उघडलं. मात्र, त्यात त्याला चक्क कॅमेरा दिसला. हे बघून त्याला धक्काच बसला.

लाईटच्या होल्डरमध्ये छुपा कॅमेरा दिसताच त्याने याची तक्रार घरमालकाकडे केली. मात्र, घरमालकाने आपल्याला याची किंचितही माहिती नसल्याचं सांगितलं. तसेच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर संबंधित दाम्पत्याने जवळच्या पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी घरमालकाल अटक केली असून इलेक्ट्रीशनविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button