देश-विदेश

पाकिस्तानला सर्वात मोठा हादरा. 58 पाक सैनिकांचा झटक्यात खात्मा. जगही हादरलं; कुणी केला मोठा गेम..


अफगाणिस्तानने शनिवारी रात्री उशिरा मोठा हल्ला पाकिस्तानच्या लष्कर चाैक्यांवर केला. रात्रभर हा हल्ला सुरू होता. आता पाकिस्तानला झटका देणारी माहिती पुढे आली असून अफगाणिस्तानने या हल्ल्यात पाकिस्तानच्या तब्बल 58 सैनिकांना ठार केले.

अफगाणिस्तानच्या निशाण्यावर पाकिस्तानच्या लष्कर चाैक्या होत्या. 25 चाैक्या पाकिस्तानच्या या अफगाणिस्तानच्या ताब्यात आहेत. पाकिस्तानच्या सात सैनिकांना अफगाणिस्तानने ओलिसही ठेवलंय. हा पाकिस्तानच्या लष्करावरील सर्वात मोठा हल्ला असल्याचे बोलले जातंय. या हल्ल्याने संपूर्ण जगात एकच खळबळ उडाल्याचे बघायले. पाकिस्तानला या हल्ल्याचा इतका मोठा धक्का बसला की, त्यांनी यावर अजून भाष्य देखील केले नाहीये.

पाकिस्तानने गुरूवारी काबुलवर बॉम्ब टाकले, त्याला उत्तर म्हणून अफगाणिस्तान सरकारने हा हल्ला केला. तालिबान सरकारचे मुख्य प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद म्हणाले की, अफगाण सैन्याने 25 पाकिस्तानी लष्करी चौक्या ताब्यात घेतल्या आहेत, त्यात 58 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. अफगाणिस्तानच्या हल्ल्यात 30 हून अधिक पाकिस्तानी सैनिक जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री मौलवी मोहम्मद याकूब मुजाहिद यांनी नुकताच पत्रकार परिषद घेतली.

जग हादरवणारी माहिती अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री मौलवी मोहम्मद याकूब मुजाहिद यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. त्यांनी स्पष्ट म्हटले की, अफगाणिस्तानची सुरक्षा समाधानकारक आहे. पाकिस्तानी लष्करातील एक विशिष्ट गट अफगाणिस्तानातील सुरक्षा व्यवस्था कमकुवत करण्याचा आणि अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. हा गट खोटा प्रचार करत आहे. सीमेवर हल्ल्यांना प्रोत्साहन देत आहे. इस्लामिक अमिरात कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास तयार आहे.

पुढे बोलताना संरक्षणमंत्र्यांनी म्हटले की, पाकिस्तानी गटाने आयसिसच्या उपस्थितीकडे दुर्लक्ष केले आहे. पाकिस्तानने आपल्या भूमीवर आयसिसच्या उपस्थितीकडे दुर्लक्ष केले आहे. मुळात म्हणजे अफगाणिस्तानला त्याच्या हवाई आणि सीमांचे रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि कोणताही हल्ला अनुत्तरीत राहणार नाही. यासोबतच आमच्या हल्ल्यात 58 पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटले. पाकिस्तानच्या सैनिकांना ओलीस ठेवलेला फोटोही त्यांनी यावेळी शेअर केला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button