देश-विदेश

ट्रम्प यांच्या या आदेशाला केराची टोपली,डोनाल्ड ट्रम्प यांचा संयम सुटला, थेट राष्ट्राध्यक्षाला फोन करून दिल्या शिव्या…


दोन वर्षांपासून इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे, या युद्धामध्ये इस्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये गाझाचं प्रचंड नुकसान झालं आहे. खूप मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली आहे.

 

दरम्यान हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपली पूर्ण ताकद पणाला लावून प्रयत्न करत आहेत. हे युद्ध लवकरात लवकर थांबावं आणि त्याचं क्रेडिट आपल्याला भेटावं असं ट्रम्प यांची इच्छा आहे.

 

डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा आणि इस्रायलमध्ये सुरू असलेलं युद्ध थांबवण्यासाठी वीस सूत्री कार्यक्रम तयार केला होता, ट्रम्प यांच्या या प्रस्तावावर हमासने सहमती देखील दाखवली होती. मात्र त्याबदल्यात आम्ही ज्या लोकांना कैद केलं आहे, त्या लोकांना सोडण्यासाठी तयार आहोत, मात्र त्याबदल्यात इस्रायलने देखील पॅलेस्टाईनचे कैदी सोडून द्यावेत, आणि आपलं सैन्य गाझामधून मागे घ्यावं अशी अट हमासने ट्रम्प यांच्यापुढे ठेवली.

 

त्यानंतर ट्रम्प यांनी इस्रायल तातडीने आपलं सौन्य गाझामधून माघार घेण्यास सांगितलं. मात्र बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्रम्प यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. इस्रायलने हमासवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये इस्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये गाझा पट्टीमधील शेकडो नागरिक मारले गेले आहेत. त्यामुळे ट्रम्प यांचा चांगलाच संताप झाला आहे.

 

डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना फोन करून, आपला संताप व्यक्त केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ट्रम्प यांनी नेतन्याहू यांना फोनवरच शिव्या देखील दिल्या आहेत. तू कसा माणूस आहेत, तू खूपच निगेटिव्ह आहेस असा ट्रम्प यांनी नेतन्याहू यांचा एकेरी शब्दात उल्लेख करत त्यांना सुनावलं आहे. दरम्यान रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्यात अपयश आल्यानंतर आता हमास आणि इस्रायल युद्ध देखील थांबवता येत नसल्यानं ट्रम्प यांचा संयम सुटल्याचं पहायला मिळत आहे. त्यांनी नेतन्याहू यांना फोन करून थेट शिव्या दिल्या आहेत, त्यामुळे आता वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button