क्राईममहाराष्ट्रराजकीय
जळगावच्या माजी महापौरांना अटक, फॉर्म हाऊसवर धक्कादायक कृत्य, ललित कोल्हे यांच्यासह 8 जणांना अटक …

जळगाव : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊसवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी फार्म हाऊसवर बनावट कॉल सेंटर सुरु होतं, असा उलगडा झाला आहे.
हे बनावट कॉल सेंटर पोलिसांनी उद्ध्वस्त केलं आहे. या बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून देश आणि विदेशातील नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे. यामध्ये माजी महापौर ललित कोल्हे यांचादेखील समावेश आहे.
पोलिसांनी आज ललित कोल्हे यांच्या ममूराबाद रस्त्यावरील एल. के. फॉर्म हाऊसवर छापा टाकला. यावेळी या ठिकाणी बनावट कॉल सेंटर होतं याचा खुलासा झाला. हे कॉल सेंटर पोलिसांनी उद्ध्वस्त केलं. या कॉल सेंटरच्या माध्यमातून देशी-विदेशी नागरिकांचे लाखो रुपये लुटल्याचा पोलिसांना संशय आहे. विशेष म्हणजे फॉर्म हाऊसमधून तब्बल 32 लॅपटॉप आणि 7 मोबाईल्स जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
पोलिसांच्या या कारवाईनंतर जळगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. असं काही सुरु असेल अशी कुणाला कल्पनादेखील नव्हती. फॉर्म हाऊसवर सुरु असणाऱ्या बनावट कॉल सेंटरमधून विदेशातील नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाची व्याप्ती किती आहे आणि कोण कोण यामध्ये सहभागी आहेत, या प्रकरणात ललित कोल्हे यांना आणखी कुणाचा वरदहस्त होता का? याचाीदेखील माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पोलीस तपासातून या प्रकरणाची सविस्तर माहिती समोर येऊ शकते.
दरम्यान, ललित कोल्हे हे आधी मनसे पक्षाशी संबंधित होते. ते 2018 मध्ये भाजपसोबत संलग्न झाले. त्यांची सप्टेंबर 2017 मध्ये जळगावचे महापौर म्हणून निवड झाली होती. तसेच त्याआधी ते मनसे आणि माजी मंत्री सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीच्या पाठिंब्याने जळगाव महापालिकेचे उपमहापौर बनले होते. याशिवाय त्यांनी 2009 आणि 2014 मध्ये मनसेच्या तिकीटावर आमदारकी लढवली होती. पण त्यांना अपयश आलं होतं. ते जळगावच्या राजकारणातील बडे प्रस्थ म्हणून मानले जातात. त्यामुळे त्यांच्याबाबत संबंधित प्रकार समोर आल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.











