क्राईम
संतापजनक! अल्पवायीन मुलीवर 8 जणांकडून वारंवार सामूहिक अत्याचार; मुलगी गर्भवती…

कल्याण : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकवून अल्पवयीन मुलीवर (Crime News) अमानुष लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये (Mumbai News) उघडकीस आली आहे. इंस्टाग्रामवरून ओळख करून घेतल्यानंतर तब्बल 7 जणांनी एका विद्यार्थिनीवर जवळपास 5 महिन्यांपर्यंत सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक बाब प्रकाशात आली आहे.
पीडितेचा अश्लील व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी तिचा दीर्घकाळ छळ केला. कल्याण महात्मा फुले पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 8 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संताप आणि खळबळ उडाली आहे.
एप्रिल महिन्यात राहुल भोईर नावाच्या तरुणाने इंस्टाग्रामवर पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीशी मैत्री केली. सुरुवातीला गोड बोलून त्याने तिचा विश्वास संपादन केला आणि प्रेमसंबंध जुळवले. त्यानंतर त्याने विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला व त्या घटनेचा व्हिडीओ तयार केला. या व्हिडीओचा वापर करून त्याने मुलीवर दबाव आणला. काही दिवसांतच तो व्हिडीओ त्याच्या मित्रांनाही पाठवला आणि अमानुष छळाची साखळी सुरू झाली.
राहुलकडून व्हिडीओ मिळाल्यानंतर देवा पाटील या दुसऱ्या तरुणाने अल्पवयीन विद्यार्थिनीला तो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानेही तिच्यावर अत्याचार केला. इतकेच नव्हे तर हा व्हिडीओ अजित सुरवसे, गौरव सुरवसे, हर्षल पोळसे, जयेश मोरे आणि किरण सुरवसे यांच्यापर्यंत पोहोचला. या सर्वांनी मिळून अल्पवयीन विद्यार्थिनीवर एकामागोमाग अत्याचार केला. जवळपास 5 महिन्यांच्या या काळात पीडित विद्यार्थिनी मानसिकदृष्ट्या खचून गेली होती. कुटुंबीय सतत विचारणा करत होते, मात्र तिने भीतीमुळे काहीही सांगितले नाही. अखेर तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघड झाले.











