सर्वसामान्यांसाठी गुड न्यूज ! आता टाटा कंपनीचे ‘हे’ बॅटरी इन्व्हर्टर मिळणार फक्त 1100 रुपयात…

अलीकडे वीजपुरवठा खंडित होणे ही एक मोठी समस्या बनली आहे. विशेषतः लहान शहरे आणि ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच असतो. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आणि रात्रीच्या वेळी सर्वसामान्य गोरगरीब जनतेला मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो.
कित्येक ठिकाणी आजही सायंकाळ झाली की लाईट जाते आणि त्या ठिकाणी मेणबत्ती शिवाय पर्याय राहत नाही. याचा थेट परिणाम दैनंदिन कामकाजावर दिसून येतो. उन्हाळ्यात तर वीज नसल्याने पंखा कुलर बंद राहतात अन यामुळे सर्वसामान्यांना प्रचंड त्रासाला समोर जावे लागते.
अशा परिस्थितीत अनेकजण बॅटरी इन्वर्टर घेण्याचा प्लॅन बनवतात. ज्या भागात लाईट नसते त्या ठिकाणी प्रत्येकाला एका चांगल्या आणि विश्वासार्ह बॅटरी इन्व्हर्टरची आवश्यकता अस्तते. दरम्यान आज आपण टाटा कंपनीच्या अशाच एका बॅटरी इन्वर्टर बाबत माहिती पाहणार आहोत जे की सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये आहे.
टाटा कंपनीने अलीकडेच नवीन टाटा बॅटरी इन्व्हर्टर कॉम्बो लाँच केला आहे. हा कॉम्बो बॅटरी इन्वर्टर बाजारात फक्त 1100 च्या बुकिंग रकमेवर उपलब्ध होतो. हा बॅटरी कॉम्बो केवळ खिशाला परवडणारा नाही तर तो एका चार्जमध्ये सुमारे तीन दिवसांचा बॅटरी बॅकअप देखील देतो.
त्याच वेळी कंपनी यावर 6 वर्षांची बॅटरी वॉरंटी देत आहे. हे बॅटरी कॉम्बो 1450VA उच्च क्षमतेचा इन्व्हर्टरसह येते. अर्थात हे इन्व्हर्टर पंखे, दिवे, एलईडी टीव्ही, लॅपटॉप आणि अगदी लहान फ्रीजसारखी सर्व घरगुती उपकरणे सहजपणे चालवू शकते असा दावा केला जातो.
हा बॅटरी इन्व्हर्टर कॉम्बो पूर्ण 3 दिवसांचा बॅटरी बॅकअप देतो. तुमच्या परिसरात वारंवार वीज खंडित होण्याची समस्या येत असल्यास हे बॅटरी इन्व्हर्टर फायद्याचे ठरणार आहे. बॅटरी नेहमीच पुन्हा-पुन्हा टॉप अप करावी लागते, परंतु टाटा बॅटरीमध्ये ही समस्या उद्भवत नाही.
कंपनीने या बॅटरी इन्व्हर्टर कॉम्बोमध्ये कमीत कमी टॉप-अप तंत्रज्ञान वापरले आहे. जे बॅटरी दीर्घकाळ सुरक्षित ठेवते. यात कंपनीने स्विच ऑन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ही तंत्रज्ञान बॅटरीला जास्त चार्ज आणि डीप डिस्चार्जपासून संरक्षण देते. त्यासोबत शॉर्ट सर्किट आणि ओव्हरलोड मध्ये सुद्धा हे बॅटरी इन्वर्टर कॉम्बो सुरक्षित राहते.
त्याच्या किमती बाबत बोलायच झाल्यास बॅटरी इन्व्हर्टर कॉम्बो फक्त 15 हजाराच्या किमतीत उपलब्ध होते. विशेष म्हणजे तुम्ही 6000 रुपये डाऊन पेमेंट करून 1100 रुपयांच्या ईएमआयद्वारे हे बॅटरी इन्व्हर्टर खरेदी करू शकता. याबाबत डिटेल माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.











