क्राईम

प्रेमभंगामुळे तरूण नैराश्येत, गळफास घेऊन संपवलं जीवन; सुसाईड नोटमध्ये म्हटलं, ‘जिसे मैं पसंत करता था …


प्रे मभंगामुळे तरूण नैराश्येत, गळफास घेऊन संपवलं जीवन; सुसाईड नोटमध्ये म्हटलं, ‘जिसे मैं पसंत करता था, उसने…”

रोहित कलीराम बारंगे (वय 27, रा. चौकीया, ता. बैतूल, मध्यप्रदेश, सध्या रा. प्रभाग क्र. 1, पठाण ले-आउट, बुटीबोरी, नागपूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

 

रोहित बारंगे हा सध्या बुटीबोरीतील सीईएटी कंपनीत मागील तीन वर्षांपासून कामगार म्हणून कार्यरत होता. रोहित आणि त्याचा मित्र नितीन मदन बारंगे हे दोघेही बंडू नानाजी पिल्लारे यांच्या बुटीबोरीतील घरात भाड्याने राहत होते. दोघेही 2 एप्रिल रोजी मूळ गावी गेले होते. 4 मे रोजी दुपारी 1 वाजता फिर्यादी जेवणासाठी घरी आले असता रोहितच्या खोलीचे दार बाहेरून कुलूपबंद होते. जेवणानंतर जेव्हा ते पुन्हा कामावर जाण्यास निघाले, तेव्हा दार कुलूपमुक्त पण आतून बंद असल्याचे आढळले.

 

दरम्यान, दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीतून खोलीत डोकावले असता रोहित गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी तत्काळ शेजारील लोकांना बोलावून पोलिसांना माहिती दिली. बुटीबोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह खाली उतरवून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.

‘जिसे मैं पसंत करता था उसने पहले…’

पोलिसांना घटनास्थळी रोहितच्या खोलीतील लाकडी टेबलावर एक सुसाईड नोट सापडली. हिंदीत लिहिलेल्या या चिठ्ठीत रोहितने लिहिले की, ‘मैं रोहित बारंगे सुसाइड कर रहा हूँ। मुझ पर किसी का भी दबाव नहीं है। क्योंकि मैं मेरी फॅमिली से परेशान हूँ। जिसे मैं पसंद करता था उसने पहले शादी के लिए हाँ कहा और अब मना कर रही है। मुझे समझ नहीं आ रहा है की मैं क्या करूं? इसलिए मैं अपने आप को समाप्त कर रहा हूँ। सॉरी मम्मी पापा’ या सुसाईड नोटमधून प्रेमभंगामुळे झालेली नैराश्यपूर्ण मानसिक अवस्था स्पष्ट होते. या घटनेने बुटीबोरी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास बुटीबोरी पोलिस करत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button