माळी गल्ली या ठीकानी भिडे गुरुजींवर कुत्र्याचा हल्ला, जखमी अवस्थेत सरकारी रुग्णालयात केले दाखल …

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. कार्यक्रमावरून घराच्या दिशेने जात असताना संभाजी भिडे गुरुजींवर कुत्र्याने हल्ला करत त्यांच्या पायाला चावा घेतला.
— Elon Musk (@elonmusk) April 15, 2025
कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या भिडे गुरूजींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास धारकरांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आटपून ते घरी जात होते तेव्हा ही घटना घडली. धारकऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेलं त्याठिकाणी उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले असल्याचे देखील सांगितले जात आहे.
संभाजी भिडे यांना सांगलीमध्ये कुत्रा चावल्याच्या घटनेनंतर महापालिकेला जाग आली असून शहरातील कुत्रे पकडण्याची मोहीम पालिकेने सुरू केली आहे.ज्या ठिकाणी संभाजी भिडे यांना कुत्र्याने चावा घेतला त्या परिसरात महापालिकेकडून कुत्रे पकडण्याची मोहीम पालिकेकडून राबवण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरातल्या विविध भागात देखील आता महापालिकेकडून कुत्रे पकडण्यात येत आहेत.
सांगली शहरातल्या माळी गल्ली या ठिकाणी रात्रीच्या सुमारास संभाजी भिडे यांना एका कुत्र्याने चावा घेतल्याचा प्रकार घडला होता त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून आता शहरातल्या भटके कुत्र्यांना पकडण्यात येत आहे. सांगली महानगर पालिकेच्या डॉग व्हॅन पथकाकडून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.