नगरसेवकाचे तिकीट मिळवून देण्याच्या बहाण्याने एका हॉटेलमध्ये नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार …

जयपूर महिला काँग्रेस कार्यकर्त्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आगामी निवडणुकीत नगरसेवकाचे तिकीट मिळवून देण्याच्या बहाण्याने एका हॉटेलमध्ये नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
याप्रकरणी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला, तसेच आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली.
सिंधी कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ३५ वर्षीय पीडित महिला बऱ्याच काळापासून काँग्रेस पक्षासाठी काम करत आहे. काही दिवसांपूर्वी या महिलेची ओळख बबलू नावाच्या व्यक्तीशी झाली. त्या व्यक्तीची पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध होते
पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटलं की, ९ एप्रिल रोजी, बबलू या व्यक्तीने त्या पीडित महिलेला जयपूर रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये बोलावून घेतलं. महिला ७:३० वाजता हॉटेलमध्ये पोहोचली. तेव्हा हॉटेलमध्ये बबलूसोबत वसीम आणि मुन्ना नावाचे दोन व्यक्तीही होते. बबलूने त्यावेळी एका काँग्रेस आमदाराला फोन केला आणि तिकीटासाठी विचारणा केली. मात्र, आमदार व्यस्त असल्यामुळे त्यांनी फोन कट केला.
यानंतर बबलूने पीडित महिलेला हॉटेलमध्ये राहण्यास सांगितले. नंतर तिघांनी एकत्र जेवण केले. आरोपीने महिलेच्या जेवणात नशेच्या गोळ्या मिसळल्या. नंतर महिला बेशुद्ध पडली. बेशुद्ध बेडवर पडल्यानंतर महिलेवर सामूहिक बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी महिलेला शुद्ध आल्यानंतर आरोपींनी पीडित महिलेला धमकी दिली.
मात्र, पीडित महिला घाबरली नाही. तिने थेट सिंधी कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेत तिन्ही आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस तिघांचा शोध घेत आहे. या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.