भारतातील ‘या’ गावात पहाटे 3 वाजता सकाळ अन् दुपारी 4 वाजता होतो अंधार …

भारतात अनेक छोटी मोठी गावं वसलेला देश असून इथे निसर्गाच्या सान्निध्यात अनेक गाव वसलेली आहे. इथल्या प्रत्येक गावांची स्वतःची खासियत असून इथे त्यांची स्वतःची परंपरा, संस्कृती आहे. भारतातील या गावांना बघिण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात.
भारतात एक असं गाव आहे जिथे सूर्यादय पहाटे 3 वाजता तर सूर्यास्त दुपारी 4 वाजता होतो. हो, अगदी खरं आहे, या गावात सूर्याचं दर्शन भारतात सर्वप्रथम होतं. तसंच या गावात अंधारही सर्वात पहिले होतो. तुम्हाला या गावाबद्दल माहिती आहे का?
कुठे आहे भारतात हे गाव!
जवळजवळ सर्वांनाच माहिती आहे की, भौगोलिक हालचालींमुळे, सूर्यकिरणे भारताच्या पूर्वेकडील भागात प्रथम पडतात आणि सूर्यकिरणे शेवटचे पश्चिमेकडील भागात दिसतात. त्याच वेळी, पूर्वेकडील भागात सूर्य सर्वात आधी मावळतो, ज्यामध्ये अरुणाचल प्रदेशचा समावेश आहे. सूर्यकिरणांची पहिली झलक इथे असल्याने, याला उगवत्या सूर्याची भूमी असंही ओळखलं जातं.
संपूर्ण अरुणाचल प्रदेशात एक गाव असे आहे जिथे सूर्याची किरणे सर्वात आधी पडतात. तुम्ही तुमच्या घरात गाढ झोपलेले असताना, तिथे आधीच दिवस उजाडलेला असतो. खरंतर, या गावाचे नाव डोंग आहे. आजूबाजूच्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या वेळेत थोडा फरक आहे. मात्र अरुणाचल प्रदेशातील या गावात सूर्योदय प्रथम होतो आणि सूर्यास्त देखील या गावात प्रथम होतो. येथील सूर्योदयाची वेळ पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान असते. त्याच वेळी, दुपारी 4 वाजेपर्यंत इथे अंधार पडतो.
या डोंग गावात पर्यटकांची संख्याही सतत वाढत आहे. अरुणाचल प्रदेशातील या गावात लोक विशेषतः सूर्योदय आणि सूर्यास्ताचे हे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी येत असतात. इथे शांत वातावरण आणि ग्रामीण परिसर लोकांचे मन मोहून टाकतो. गेल्या काही वर्षांपासून नवीन वर्षात येथे पर्यटकांची संख्या वाढली आहे. हे दृश्य पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी प्रत्येकजण येथे येतात. त्यामुळे, येथील लोकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी राज्य सरकार विकासाच्या गतीवर लक्ष केंद्रित करत आहे.