ताज्या बातम्या

प्रवासी बोटीला छिद्र पडलं अन् 130 जण बुडणार इतक्यात…


पर्यटकांची गर्दी असणाऱ्या आणि आठवडी सुट्टी, लाँग विकेंडला धरून या गर्दीला सातत्यानं आकर्षित करणाऱ्या अलिबागजवळील समुद्रात एक भयंकर घटना घडली. समयसूचकतेमुळ इथं मोठा अनर्थ टळला.

रायगड जिल्ह्यात असणाऱ्या अलिबागनजीक मांडवा जेट्टी इथं ही दुर्घटना घडल्याचं वृत्त समोर आलं. एका प्रवासी बोटीला छिद्र पडल्यानं अचानकच बोटीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली.

 

प्राथमिक माहितीनुसार या घटनेवेळी बोटीवर 130 प्रवासी होते. वेळी महतत्वाच्या गोष्टी लक्षात येताच तातडीनं प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आणि त्यांचा जीव वाचवला गेला. सायंकाळी साधारण साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. मांडवा सागरी पोलिसांनीसुद्धा सदरील घटनेच्या वृत्तास दुजोरा दिला. बोटीमध्ये पाणी शिरत असल्याचं कळतात ही बातमी वायुवेगानं तिथं पसरली आणि प्रवाशांमध्ये भीतीनं एकच गोंधळ माजला. पण, बोटी पाणी शिरण्यास सुरुवात होताच तातडीनं एक मोठं संकट थोपवून धरण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आणि या बोटीतील सर्वांनाच सुरक्षित स्थळी उतरवण्यात आलं.

 

आठवडी सुट्टी, वीकेंड, आठवडी सुट्टीला धरून लागून आलेली एक मोठी सुट्टी यासाठी मुंबईवरून मोठ्या संख्येनं पर्यटक अलिबागच्या दिशेनं निघतात. रस्ते मार्गानं होणाऱ्या प्रवासाच्या तुलनेत वाहतूक कोंडीला बगल देत ही मंडळी मोठ्या प्रमाणानं सागरी वाहतुकीचा पर्याय निवडतात.

 

भाऊचा धक्का आणि गेट वे ऑफ इंडिया अर्थात अपोलो बंदर जेट्टी इथून अनुक्रमे रेवस, उरण-करंजा, मांडवाच्या दिशेनं जाणाऱ्या बोटीनं हा प्रवास केला जातो. प्रवाशांचा वाढता आकडा पाहता अलिबागमध्ये होणारी गर्दी सध्या चर्चेचा मुद्दा ठरत आहे. पण, त्याचदरम्यान सागरी वाहतुकीच्या संदर्भात वापर होणाऱ्या बोटी, प्रवाशांची सुरक्षितता हे काही मुद्दे मात्र अनावधानं मागे पडतात किंवा काही प्रसंगी दुर्लक्षित राहतात. त्यामुळं सागरी प्रवास करत असताना सदर सेवा पुरवणाऱ्या व्यवस्थापनासोबतच सतर्क राहत प्रवास करणं हे प्रवाशांचंही कर्तव्य आहे ही बाब नाकारता येत नाही.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button