
भुता-खेतांचं नाव ऐकलं की लहान मुलं सहसा घाबरतात. त्यामुळे त्यांना घरात एकटं रहायला किंवा अंधारात राहण्याची भीती वाटते. बऱ्याच लहान मुलांना त्यांच्या खोलीत एकटं झोपायलाही आवडत नाही.
त्यांची ही भीती मनातून काढण्याची गरज असते, पण एखाद्या मुलाची ही भीती खरी ठरली तर ? असंच काहीस अमेरिकेच्या कॅन्सासमध्ये घडल्याचं उघड झालं आहे.
अनेकदा मुलांना अशी भीती वाटते की त्यांच्या पलंगाखाली भूत किंवा राक्षस आहे. पण, अमेरिकेतील कॅन्सासमध्ये राहणाऱ्या एका मुलानेही अशीच तक्रार केली तेव्हा ती त्याची मनातील भीती नव्हे तर ते खरं असल्याचं उघड झालं. मुलाला सांभाळणाऱ्या महिलेने जेव्हा बेडखाली वाकून पाहिले तेव्हा तिथे खरोखरच एक राक्षस होता. त्याची तिने कल्पनाच केली नव्हती.
माझ्या बेडखाली राक्षस आहे
अमेरिकेतील ग्रेट बेंड येथे राहणाऱ्या मुलाला सांभाळण्यासाठी एक आयादेखील होती. पण तो मुलगा त्या आयाला सतत सांगायचा की माझ्या बेडखाली एक राक्षस आहे. ते ऐकून त्या महिलेला पहिल्यांदा असं वाटलं की त्याला भीती वाटत असेल, पण तो मुलगा जेव्हा पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करून सांगायाला लागला तेव्हा तिला शंका आली. आणि त्या महिलेने बेडखाली वाकून पाहिलं पण तिथलं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिथे तिने जे पाहिलं ते कल्पनेपलीकडचे होते. मुलाच्या पलंगाखाली खरोखरच एक माणूस उपस्थित होता, ज्याचे डोळे त्या महिलेच्या नजरेला भिडले, पण ती घाबरली नाही. तिने हिंमत दाखवली आणि मुलाला न घाबरवता, उलट त्या माणसाशी संवाद साधला.
पोलिसांनी पकडला ‘ राक्षस’
पण बोलता बोलता त्या महिलेचा वाद झाला आणि प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं आणि मुलाला धक्काही मारला. बेडखालचा तो माणूस पळून जायला लागला, पण तेवढ्यात तिथे आलेल्या पोलिसांनी त्याला पकडलं. मार्टिन व्हिलालोबोस (वय 27) असे त्या इसमाचे नाव असून तो आधीही याच घरात रहात होता.
वाढला आणि एका मुलाला ढकलण्यात आले. दरम्यान, तो माणूस पळून गेला पण पोलिसांनी त्याला पकडले. त्या व्यक्तीची ओळख २७ वर्षीय अशी झाली आहे, जो पूर्वी कुटुंब राहत असलेल्या घरात राहत होता.तिथे आधी एक कुटुंब रहात असतानाही त्या इसमाचा याच घरात मुक्काम होता. सध्या त्याला घरात घुसण्याच्या गुन्ह्यासाठी ४ कोटी रुपयांचा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.