लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट …

“अकल्पनीय” सहजपणे कल्पना करू शकत नाही, त्याहूनही पुढे अशी बातमी अलीगडमधून समोर आली आहे. आईने लावलेली माया आईनेच वाया घालवली असून होणाऱ्या जावयासोबत सासू ‘सैराट’ झाली आहे.काही दिवसावरचं लेकीचं लग्न बाकी असतांना नवरी मुलीची आई जावयासोबत पळून गेली.
अलिगड जिल्ह्यातील मद्रक पोलीस स्टेशन परिसरातील मनोहरपूर गावात घडली असून सासू जावयाच्या सैराट घटनेची परिसरात एकच चर्चा आहे.याप्रकरणी जितेंद्र कुमार नावाच्या व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जितेंद्रची पत्नी मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत लग्नापूर्वी घरातून पळून गेली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, दोघांनी एकत्र पळ काढला आहे. दोघे घरातून जवळपास त्यांनी सुमारे 3.5 लाख रुपये रोख आणि सुमारे 5 लाख रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिनेही पळवून नेले आहेत.
जितेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 एप्रिल रोजी त्यांच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाची मोठ्या उत्साहात तयारी सुरु होती. नातेवाईकांना पत्रिका देखील पाठवण्यात आल्या होत्या. घरात आनंदी वातावरण होतं. पण अचानक पत्नी घरातून गायब झाली. पत्नी नातेवाईकांकडे पत्रिका देण्यासाठी गेली असावी.. असं जितेंद्र यांना वाटलं. पण असं काहीही नव्हतं.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे आणि त्यात फसवणूक, विश्वासघात आणि मालमत्तेची चोरी यासारख्या गंभीर बाबींचा समावेश आहे. महिला आणि तरुणाचा शोध सुरु आहे. मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर शोध सुरु आहे.