हनीट्रॅपमध्ये फसला सराफ,१३ वर्षे महिलेनं उकळले पैसे पुण्यातील सराफ व्यापाऱ्याला गंडा …

पुणेः पुण्यातील एका सराफाला हनीट्रॅपमध्ये अडकवून २७लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. सराफ व्यापाऱ्याला बदनामीची धमकी देत त्याच्याकडे पैसे मागितले. पैसे नसल्यानं व्यापाऱ्यानं राहतं घर विकून महिलेला पैसे दिले.
त्या पैशातून महिलेनं घर खरेदी केलं आणि उर्वरित कर्जाचे हफ्तेसुद्धा सराफ व्यापाऱ्याला भरायला लावले. शेवटी महिलेकडून जास्त पैशांची मागणी होऊ लागल्यानं व्यापाऱ्याने थेट पोलीस ठाणे गाठले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, केडगावच्या ३२ वर्षीय महिलेनं पुण्यातील सराफ व्यापाऱ्याला हनीट्रॅपमध्ये अडकवलं. तब्बल १३ वर्षांपासून महिला बदनामीची भीती घालून व्यापाऱ्याकडून पैसे उकळत होती. महिलेची बहीण पुण्यात असून तिच्या माध्यमातून सराफ व्यापाऱ्याशी ओळख झाली होती. आपल्याला दागिने करायचे असल्याचं सांगून महिलेनं व्यापाऱ्याशी ओळख वाढवली होती.
सराफ व्यापाऱ्याशी ओळख झाल्यानंतर व्हिडीओ कॉल आणि फोन कॉल करून ती बोलत असे. २०१३ मध्ये पुण्याहून नगरमार्गे गावी जाताना महिलेचा व्यापाऱ्याला फोन आला. आपलं गाव वाटेतच असून घरी या असा आग्रह महिलेनं केला. महिलेच्या आग्राहामुळे व्यापाऱी त्यांच्या घरी गेला आणि त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली.
महिलेनं व्यापाऱ्याला एक दिवस तिच्या बहिणीच्या घरीही बोलावलं होतं. महत्त्वाचं काम असल्याचं सांगून मुक्कामी थांबवलं. त्यानंतर महिला व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करत होती. महिलेच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढतच चालल्या होत्या.
पैसे दिले नाहीस तर व्हिडीओ व्हायरल करेन अशी धमकी महिला देत असते. दरम्यान, पैसे नसल्यानं शेवटी व्यापाऱ्यानं सगळा प्रकार पत्नीला सांगितला. तेव्हा पत्नीनेही बदनामी होईल या भितीने पुण्यातलं घर विकून महिलेला पैसे देण्याचा सल्ला दिला. पतीने घर विकलं आणि महिलेला १८ लाख रुपये दिले. महिलेनं ४३ लाखांचं घर खरेदी करून २३ लाखांच्या कर्जाचे हफ्ते व्यापाऱ्यालाच भरायला सांगितले. आतापर्यंत घर घेण्यासाठी आणि कर्जाचे हफ्ते असे मिळून व्यापाऱ्याने महिलेला २७ लाख ५६ हजार रुपये दिले. व्यापाऱ्याने शेवटी पोलिसात धाव घेऊन महिलेविरोधात तक्रार दिली. आता पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
https://x.com/narendramodi/status/1909916856514658798?t=siNHcutKidQfeiDLViOCgA&s=09