बाबा वेंगापेक्षा भयानक आहे जपानी बाबा वेंगाची भविष्यवाणी; भारतासाठी धोक्याचा इशारा! जुलै महिन्यात..

म्यानमार आणि थायलंडमधील भूकंपानंतर संपूर्ण जग हादरले आहे. प्रसिद्ध भविष्यवेत्या बाबा वेंगा याने याचे भाकित केले होते. यानंचर आता जपानी बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत आली आहे.
जपानी बाबा वेंगाची भविष्यवाणी ही बाबा वेंगाच्या भविष्यवाणीपेक्षा भयानक आहे. येत्या 3 महिन्यात महाप्रलय येणार असल्याची भविष्यवाणी जापानी बाबा वेंगाने केली आहे. भारतासाठीही धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. जपानी बाबा वेंगाने केलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. जाणून घेऊया कोण आहे हा जपानी बाबा? जपानी बाबा वेंगाने 2025 या वर्षासाठी काय भविष्यवाणी केली आहे जाणून घेऊया.
बाबा वांगा आणि नास्त्रेदमस यांची भविष्यवाणी नेहमीच चर्चेत असते. यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. अशातच जपानचे प्रसिद्ध कलाकार आणि भविष्यवेत्ता रियो तुतुस्की यांची भविष्यवाणी चर्चेत आली आहे. रियो तुतुस्की जपानी बाबा वेंगा म्हणून ओळखले जातात. जुलै 2025 पर्यंत जगात आणखी एक विनाशकारी आपत्ती येऊ शकते, जी आतापर्यंतच्या सर्वात भयानक संकटांपैकी डेंजर असेल. रियो तुतुस्की यांचा अनेक भाकिते खरी ठरली आहेत.
1995 मध्ये रियो तुतुस्की त्यांच्या डायरीत अनेक भाकिते लिहून ठेवली आहेत. 25 वर्षांनी, म्हणजे 2020 मध्ये, एक रहस्यमयी विषाणू जगात थैमान घालू शकतो. 2020 मध्ये जगात कोरोनाचा प्रकोप पहायला मिळाला. रियो तुतुस्की याने केलेली राजकुमारी डायनाचा मृत्यू, कोबे भूकंप आणि त्सुनामीबद्दलच्या भाकितेही खरी ठरली.
2025 मध्ये मोठ्या आपत्तीचा इशारा
रियो तुतुस्की यांनी 2025 या वर्षासाठी देखील भयानक भाकिते वर्तवली आहेत. जुलै 2025 मध्ये जगात मोठी त्सुनामी येणार असल्याचा इशारा रियो तुतुस्की यांनी दिला आहे. ही त्सुनामी 2011 मध्ये जपानला आलेल्या त्सुनामीपेक्षा तिप्पट मोठी असेल. फिलिपिन्स, तैवान, इंडोनेशिया देशांना या त्सुनामीचा मोठा फटका बसेल. भारतातही या त्सुनामीमुळे मोठा महाप्रलय येईल. भारतात मोठे नुकसान होऊ शकते असे भाकित या जपानी बाबा वेंगाने वर्तवले आहे.