पायात-बोटात काटा रुतल्यास वापरु नका पिन किंवा सुई, करा ‘हा’ उपाय- काटा आपोआप बाहेर येईल …

हल्ली अनवाणी पायाने कुणीही फारसं चालत नाही. त्यामुळे पायात काटा किंवा काचेचा एखादा बारीक कण घुसला आहे, अशा घटना खूप काही घडत नाहीत. पण तरीही कधी ना कधी लहान मुलं असो किंवा मग मोठी माणसं असो बारीकसा काटा किंवा काचेचा अगदी बारीक कण तळहाताच्या किंवा तळपायाच्या त्वचेमधे घुसतो.
बऱ्याचदा तो काटा एवढा आत जातो की नखाने टोचून तो काढून टाकणं अजिबात शक्य होत नाही. अशावेळी मग टोकदार सुई, पिन घेऊन जिथे काटा घुसला आहे ती आणि त्याच्या आजुबाजुची जागा थोडी कोरण्यात येते. पण हे खूप जास्त धोकादायक असते (How To Remove Thorn Or Splinter Stuck In Your Skin ?). त्यामुळे असं काहीही न करता अगदी अलगदपणे काटा त्वचेच्या बाहेर यावा यासाठी काय करता येईल ते पाहूया..(home hacks to remove splinter or thorn from skin)
बोटामध्ये घुसलेला काटा किंवा काचेचा तुकडा कसा काढावा?
पिन, सुई अशा टोकदार वस्तू आपल्या त्वचेमध्ये टोचून काटा काढणे अतिशय धोकादायक ठरू शकते. यामुळे त्वचेचे आजारही होऊ शकतात. त्यामुळे लहान मुलांच्या बाबतीत तर कधीही हा उपाय करू नये, असं डॉक्टर नेहमीच सुचवतात.
म्हणूनच आता हा एक अतिशय सोपा उपाय पाहून ठेवा. हा उपाय करून तुमच्या त्वचेमध्ये घुसलेला काटा अगदी अलगदपणे त्वचेच्या बाहेर येईल.
त्यासाठी एक वाटी घ्या. त्या वाटीमध्ये थोडंसं मीठ आणि थोडं व्हाईट व्हिनेगर घाला. जेवढं व्हाईट व्हिनेगर असेल त्याच्या साधारण दुप्पट गरम पाणी घाला.
आता जिथे काटा घुसला आहे तो भाग या पाण्यामध्ये २ ते ३ मिनिटांसाठी बुडवून ठेवा. असं केल्यास काटा आपोआप पाण्यात बाहेर येऊन जाईल. जर काटा बाहेर आलाच नाही तर तुमच्या बोटाने अलगद दाब देऊन काटा बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. अन्यथा पुन्हा एकदा हा उपाय करा.