वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत मंजूर; मध्यरात्री नेमकं काय घडलं?

वक्फ सुधारण विधेयक अखेर लोकसभेत मंजूर झाले आहे. काल रात्री उशीरा वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी मतदान घेण्यात आले. २८८ विरूद्ध २३२ मतांनी हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे.
वक्फ म्हणजे काय ?
वक्फ हा अरबी शब्द आहे. याचा अर्थ देवाच्या नावाने अर्पण केलेली वस्तू किंवा परोपकारासाठी दिलेले धन. यामध्ये जंगम आणि स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कोणताही मुस्लिम आपली संपत्ती वक्फला दान करू शकतो. वक्फ बोर्ड वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन करते. ती कायदेशीर संस्था आहे. प्रत्येक राज्यात वक्फ बोर्ड आहे. वक्फ बोर्डाकडे मालमत्तांची नोंदणी अनिवार्य आहे. देशात शिया आणि सुन्नी असे दोन प्रकारचे वक्फ बोर्ड आहेत.
वक्फ सुधारणा विधेयकात नेमकं काय ?
वक्फ बोर्डावर आधी मुस्लिम सदस्य असणं बंधकारक होते. पण सुधारित विधेयकानुसार गैर मुस्लिम सदस्यांचा समावेश करणं बंधनकारक करण्यात आले आहे.
मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचे अधिकार आधी आयुक्तांने होते. पण आता नव्या विधेयकानुसार, जिल्हाधिकारी वफ्कच्या जमीनीचे सर्वेक्षण करतील.
वक्फ बोर्डावर आधी सरकारकडून चार सदस्यांची नियुक्ती करण्यात येत होती, तर चार सदस्य निवडून येत होते. आता वक्फ बोर्डाच्या सुधारित विधेयकानुसार, ८ सदस्यांमध्ये किमान २ सदस्या गैर मुस्लिम असतील.
आधी वक्फ ट्रिब्युनलचा फैसला अंतिम होता, त्याला कोर्टात आव्हान देता येत नव्हते. पण सुधारणा विधेयकानुसार, वक्फच्या कोणत्याही वादग्रस्त संपत्ती विरोधात हायकोर्टात जाता येणार आहे.
मशीद असेली जमीन किंवा मुस्लीम धर्म कार्यासाठी वापर होणाऱ्या वस्तूवर वक्फ बोर्डाचा दावा असायचा. पण आता जमीन दान केली नसेल आणि त्यावर मशीद असेल तर ती संपत्ती वक्फची होणार नाही.