विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी.हवामान विभागाकडून अलर्ट जारी …

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज विजेच्या कडकडाटासह (Rain Update) पावसाने हजेरी लावलीयं. पुणे, अहिल्यानगर, साराता, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत पावसाने जोर धरला.
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाळ्यापासून काहीसा दिलासा मिळालायं. तर दुसरीकडे हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलायं.
पुण्यातील शिवणे आणि सिंहगड रस्ता परिसरात रिमझिम पाऊस झाला. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागांतही रिमझिम पावसाच्या सरी पडल्या आहेत. मागील काही दिवसांपासून वातावरण ढगाळ होते, आणि आज हलक्या सरी कोसळायला सुरुवात झाली.
दरम्यान, अचानक पावसाने आगमन केल्याने नागरिकांची एकच धांदल उडाल्याचं पाहायला मिळालंय. तर दुसरीकडे नागरिकांनी पुढील 24 तास सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय. मराठवाडा, विदर्भ, आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आलायं. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अलर्ट जारी केला आहे.