म्यानमारमधील भूकंपबळींची संख्या १,७०० वर,३०० हून अधिक बेपत्ता …

म्यानमारमध्ये शुक्रवारी (दि.२८) झालेल्या भूकंपात मृतांचा आकडा १,७०० पेक्षा जास्त झाला आहे कारण ढिगाऱ्यातून आणखी मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, अशी माहिती देशाच्या लष्कराच्या नेतृत्वाखालील सरकारने सोमवारी (दि.भूकंपात मशीद कोसळल्याने सुमारे ७०० जणांचा मृत्यू
पवित्र रमजान महिन्यानिमित्त शुक्रवारी मशीद प्रार्थनेसाठी गर्दी होती. भूकंपात मशीद कोसळल्याने सुमारे ७०० जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती स्प्रिंग रिव्होल्यूशन म्यानमार मुस्लिम नेटवर्कच्या सुकाणू समितीचे सदस्य तुन की यांनी दिली. ते म्हणाले की, भूकंपात सुमारे ६० मशिदींचे नुकसान झाले किंवा त्या उद्ध्वस्त झाल्या आहेत.
देशातील सहा क्षेत्रांमध्ये आणीबाणीची परिस्थिती
आंतरराष्ट्रीय बचाव समितीच्या म्यानमारमधील कार्यक्रम उपसंचालक लॉरेन एलेरी यांनी ‘असोसिएटेड प्रेस’ शी बोलताना सांगितले की, या टप्प्यावर आम्हाला विनाशाचे प्रमाण स्पष्ट नाही. सहा क्षेत्रांमध्ये आणीबाणीची परिस्थिती आहे. सध्या सर्वात जास्त गरजा कुठे आहेत याचे मूल्यांकन केले जात आहे. आपत्कालीन वैद्यकीय सेवा, मानवतावादी पुरवठा आणि इतर मदत पुरवत आहेत.
सुमारे १५ लाख लोकसंख्या असलेल्या मंडाले जवळ झालेल्या भूकंपामुळे इमारती कोसळल्या आणि शहराच्या विमानतळासारख्या इतर पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, रशिया, चीन, भारत आणि अनेक आग्नेय आशियाई देशांसह अनेक देशांतील आंतरराष्ट्रीय बचाव पथके आता मान्यमारमध्ये दाखल झाले आहेत.