क्राईम

पुणे बलात्कार प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट! आरोपीने तिसऱ्यांदा बलात्कार करताना


पुण्याच्या स्वारगेट स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आता धक्कादायक ट्विस्ट आला आहे. आरोपीने तिसऱ्यांदा बलात्कार केल्याची तक्रार पीडित तरुणीने केली आहे.

पीडित तरुणीने राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना एक पत्र लिहीले आहे. या पत्रात पीडित तरुणीने पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

 

26 फेब्रुवारी रोजी पुण्याच्या स्वारगेट बस डेपो मध्ये तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाला आहे. तरुणी पुण्याच्या स्वारगेटवरुन फलटणला जात होती यावेळी आरोपीने एका बंद पडलेल्या शिवशाही बसमध्ये नेत तरुणीवर बलात्कार केला. या घटनेच्या तब्बल 75 तासांनी पुणे पोलिसांनी नराधम दत्तात्रय गाडेला गुनाट गावातून अटक केली. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.

 

पीडित युवतीने पोलिसांवर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यासंदर्भातील पत्र तिने राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना लिहिले आहे. या पत्रात पोलिसांकडून आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळणारी वागणूक तिने लिहिली आहे. आपण मागणी केलेल्या वकिलांची नेमणूक न करता दुसराच वकील आपणास देण्यात आल्याचे तिने पत्रात म्हटले आहे.

 

पीडित तरुणीच्या पत्रातील काही महत्त्वाचे मुद्दे

पुरुष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माझी इच्छा नसताना माझी संमती घ्यायची व स्वतः माझी वैद्यकीय चाचणी करायची
अनेक पुरुष पोलीस अधिकाऱ्यांना मी माझ्यावर कसा अत्याचार करण्यात आला ते सांगायचे
आरोपी दत्ता गाडे याने दोनदा माझ्यावर बलात्कार केल्यानंतर तिसऱ्यांदा त्याने पार्श्वभागाकडून लैंगिक जबरदस्तीचा प्रयत्न केला

तेव्हा मी पूर्ण ताकदीने विरोध केला होता, कदाचित दोनदा लैंगिक अत्याचार केल्याने त्याने सुद्धा माघार घेतली आणि तो पळून गेला
पुणे पोलिसांकडून मला सांगण्यात आले होते की तुला तीन वकिलांचे नावे आम्ही सुचवू आणि त्यातून तुझ्या पसंतीचे वकील आम्ही नेमू

मी असीम सरोदे यांची नेमणूक करावी अशी मागणी केली असता, तुला यायला एक दिवस उशीर झाला असं पुणे पोलिसांकडून मला सांगण्यात आले, म्हणजे अन्यायग्रस्त मुलगी म्हणून माझ्या म्हणण्याला काहीच महत्त्व नाही असा कायदा आहे का?
मला अजय मिसार यांच्या बद्दल आत्ताच आक्षेप घ्यायचे नाहीत, पण मी माहितीशास्त्र अभ्यासक्रम केला असल्याने माझ्याकडे आक्षेप घेण्यासारखी माहिती आहे हे नक्की आपल्याला सांगू इच्छिते

घटनेच्यावेळी मी आरडाओरडा केला त्यानंतर माझा आवाज खोल गेला, आवाजच निघत नव्हता व त्याचवेळी माझ्या मनात बलात्काराच्या विविध घटनांमध्ये विरोध केल्याने जखमी झालेल्या मुली मारून टाकण्यात आलेल्या गोष्टी आल्या मी जीव वाचवणे महत्त्वाचे मानले.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button