क्राईम
कुणाल कामराच्या अडचणीत वाढ, ट्वीट करत चाहत्यांना केले मोठे आवाहन

कॉमेडियन कुणाल कामराच्या एका विडंबनात्मक गाण्यामुळे राज्यात नवा वाद उद्भवला आहे. कुणाल कामराने गायलेल्या एका गाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान केल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.
दरम्यान, कुणाल कामराने ‘दिल तो पागल है’ या लोकप्रिय चित्रपटातील गाण्याच्या चालीवर एक गाणं बनवलं होतं. यात त्याने एकनाथ शिंदे यांचे नाव घेता टीका केली होती. यानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर त्याला अनेक धमक्या देण्यात आल्या. तसेच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही यावरून गदारोळ निर्माण झाला होता. आता टी-सीरीजने त्याच्या याच व्हिडीओवर कॉपीराइट स्ट्राइक पाठवल्याने त्यांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत.