क्राईम

गुरुजी तुम्हीही! एका शिक्षिकेवर प्राचार्य आणि शिक्षक दोघांचा जीव जडला, प्रेमाच्या त्रिकोणात एकाचा बळी …


बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत शिकवणाऱ्या महिलेवर मुख्याध्यापक आणि शिक्षक दोघेही प्रेमात पडले. प्रेमाच्या या त्रिकोणात शिक्षक रामाश्रय यादव यांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील कुशेश्वर स्थान येथे जानेवारी महिन्यात ही हत्या झाली होती. घटनेच्या ५५ दिवसांनंतर पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला तेव्हा आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या. पोलिसांनी मुख्याध्यापकांसह सात जणांना खुनाच्या आरोपाखाली अटक केली असून त्यात तीन हल्लेखोरांचा समावेश आहे.

 

उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष चंद्र चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अदलपूर उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र पासवान आणि शिक्षक रामाश्रय यादव यांचे शाळेतील एका शिक्षिकेसोबत त्रिकोणी प्रेमसंबंध होते. त्यामुळं नेमबाज मुकेश यादवला सुपारी देण्यात आल्याचं समोर आलं आहे. मुकेशने त्याच्या इतर साथीदारांसोबत मिळून ही घटना घडवून आणली.

 

याशिवाय परस्पर वैमनस्यातून रामाश्रय यादव यांची हत्या करण्यात आली होती. बहेरा येथील रहिवासी गंगा यादव, लालो यादव आणि हिरा यादव या तिघांनीही शिक्षकाच्या हत्येची सुपारी दिली होती. गावात वर्चस्व प्रस्थापित करण्यावरून गंगा यादव यांचा रामाश्रय यांच्याशी वाद झाला होता. त्यांच्यात बराच काळ वैर होते.

 

शाळेत जात असताना फिल्मी स्टाईल हत्या –

२८ जानेवारी रोजी अदलपूर सरकारी शाळेतील शिक्षक रामाश्रय यादव यांची रस्त्याच्या मधोमध गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सकाळी साडेनऊच्या सुमारास शिक्षक दुचाकीवरून शाळेत जात असताना ही घटना घडली. हल्लेखोरांनी त्यांना दुचाकीवरून ओव्हरटेक केले, त्यानंतर त्याच्या डोक्यात गोळी झाडून तेथून पळ काढला. रामाश्रय यादव यांच्यासोबत दुचाकीवर एक महिला शिक्षिकाही होती.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button