भारतातील ‘या’ नदीच्या पाण्यात वाहते शुद्ध सोनं! कुणीही कधीही जाऊन काढू शकतात सोनं …

भारतात नद्यांना अत्यंत पवित्र मानले जाते. नद्यांना धार्मिक महत्व आहे. यामुळे भारतातील प्रत्येक नदीचे खास ओळख आणि वैशिष्ट्य आहे. भारतात अशीच एक नदी आहे जी खूपच खसा आहे.
या नदीच्या पाण्यात शुद्ध सोनं वाहते. विशेष म्हणजे कुणीही जाऊन सोन्याचे कण गाळून काढू शकतात. जाणून घेऊया ही नदी भारतात आहे तरी कुठे?
भारतात हजारो लहान-मोठ्या नद्या वाहतात. या नद्या लोकांसाठी उपजीविकेचे साधन देखील आहेत. अनेक राज्यांमधील शेतकरी शेतीसाठी नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. भारतात एका असी नदी आहे जिथून सोने मिळते. ही नदी जवळपास राहणाऱ्या लोकांसाठी उत्पन्नाचे साधन आहे. लोक या नदीतून सोने काढतात आणि ते विकून पैसे कमवतात. या पैशातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. पण सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या नदीत सोने कुठून येते. याबद्दल कोणालाही माहिती नाही. हे जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी संशोधन केले, परंतु त्यांनाही यश मिळाले नाही. त्यामुळे नदीत सोने कुठून येते हे अजूनही एक गूढ आहे.
शुद्ध सोनं वाहणाऱ्या या नदीचे नाव आहे स्वर्णरेखा नदी. ही नदी भारतातील झारखंड राज्यात वाहते. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्येही ही नदी वाहते. झारखंडची राजधानी रांचीपासून 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या छोटा नागपूर पठारावर असलेल्या नागडी गावातील एका विहिरीतून ही नदी उगम पावते. या नदीची एकूण लांबी 474 किमी आहे. ही नदी बंगालच्या उपसागराला मिळते.
झारखंडमध्ये स्वर्णरेखा नदी जिथून वाहते तिथे पहाटेपासूनच लोकांची गर्दी पहायला मिळते. सोने काढण्यासाठी पहाटेपासून लोक येथे वाळू चाळतात. अनेक पिढ्यांपासून लोक त्यातून सोने काढत आहेत आणि पैसे कमवत आहेत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या नदीतून सोने काढतात.
स्वर्णरेखा नदीत सोने कुठून येते हे अजूनही एक गूढ आहे. काही भूगर्भशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की स्वर्णरेखा नदी खडकांमधून वाहते. कदाचित म्हणूनच त्यात सोन्याचे कण आढळतात. तथापि, याबद्दल कोणतेही ठोस पुरावे नाहीत.
स्वर्णरेखा नदीच्या उपनदीतही सोने आढळते. स्वर्णरेखाची उपनदी असलेल्या करकरी नदीच्या वाळूमध्येही सोन्याचे कण आढळतात. लोक यामध्येही सोने काढतात. करकरी नदीतून स्वर्णरेखा नदीत सोने येते असाही अंदाज आहे.