क्राईम

साखपुड्यानंतर मुलाने भावी पत्नीसोबत हॉटेलमध्ये रात्र घालवली, मग दुसऱ्यादिवशी मोडलं लग्न अन …


मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये एका मुलीला तिच्या होणाऱ्या नवऱ्याने लग्नाआधी दगा दिला. साखरपुडा झाल्यानंतर मुलगा मुलीला म्हणाला की, मला तुला एकट्यामध्ये भेटायचं आहे. मुलगी सुद्धा कुटुंबियांना सांगून मुलाला भेटायला गेली.

तिथे मुलाने आधीपासून हॉटेलमध्ये रुम बुक करुन ठेवली होती. मुलगा मुलीला रुममध्ये घेऊन गेला. तिथे तो मुलीवर संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करु लागला. मुलीने त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला. हे सर्व लग्नानंतर असं तिने स्पष्ट शब्दात सांगितलं. पण मुलगा अडून बसला. आपलं लग्न होणार आहे, मग तुला संबंध ठेवण्यात काय अडचण आहे? असं मुलगा तिला म्हणाला. मुलाने मुलीला भावनिक बनवलं व तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले.

 

त्यानंतर दुसऱ्यादिवशी सकाळी मुलाने तुझ्यासोबत लग्न करायच नाही, असं सांगितलं. हे ऐकून नवरी मुलीच्या पायाखालची जमीन सरकली. मुलीने या बद्दल कुटुंबियांना सांगितलं. त्यानंतर ती पोलीस स्टेशनमध्ये गेली. पोलिसांची मदत मागितली. मुलाविरोधात फसवणुकीची तक्रार दिली.

 

कुटुंबियांच्या होकारानंतर मी देवांशसोबत गेली

मुलीने सांगितलं की, माझा साखरपुडा मागच्या वर्षी जुलै महिन्यात दतियाच्या इंदरगढमध्ये राहणाऱ्या देवांश साहू सोबत झाला होता. साखरपुड्यानंतर आमच्यामध्ये बोलणं सुरु झालं. आम्ही अनेक तास बोलायचो. काही दिवसांनी देवांशने मला कुठेतरी फिरायला जाऊया म्हणून विचारलं. कुटुंबियांच्या होकारानंतर मी देवांशसोबत गेली. त्यावेळी मला तो हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे आम्ही आमचं नातं पुढच्या टप्प्यावर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.

 

आता आपलं लग्न होणारच आहे, यात काय चुकीच आहे?

पीडितेने पोलिसांना सांगितलं की, देवांशने कुटुंबियांना सांगितलेलं की, तो तिला बैजाताल येथे घेऊन जात आहे. पण तो तिला सोबत तानसेन हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने आधीपासून रुम बुक करुन ठेवली होती. जेव्हा मुलीने त्याच्यासोबत संबंध ठेवायला नकार दिला, तेव्हा त्याने तिला इमोशनल केलं. बोलला की आता आपलं लग्न होणारच आहे, यात काय चुकीच आहे? मुलगी सुद्धा त्याच्या बोलण्यामध्ये फसली आणि देवांशसोबत संबंध ठेवले.

 

मुलीने कुटुंबियांना सर्व प्रकार सांगितला

मुलीने सांगितलं की, हॉटेलमधून परतल्यानंतर देवांशच वर्तन बदललं. आधी तो बोलायला खूप इंटरेस्टेड होता. पण नंतर तो फोनही उचलत नव्हता. देवांशच्या वडिलांनी फोन करुन लग्न मोडल्याच सांगितलं. त्यानंतर मुलीने कुटुंबियांना सर्व प्रकार सांगितला. मुलीच म्हणण ऐकून घेतल्यानंतर कुटुंबिय तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून पुढील तपास सुरु आहे.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button