Pyramids च्या त्रिकोणी इमारतींखाली जमिनीत 2 KM पर्यंत.., नव्या शोधाने गूढ वाढलं; ही नुसती थडगी नाही तर..

जगभरातील शास्रज्ञांसाठी आजही कोडं असलेल्या इजिप्तमधील पिरॅमिड्सचं गूढ नव्या संशोधनानंतर अधिक वाढलं आहे. शास्त्रज्ञांनी रडार तंत्रज्ञानाचा वापर करून गिझाच्या पिरॅमिडजवळ जमिनीखाली एक मोठी भूगर्भीय रचना शोधून काढली आहे.
या पिरॅमिड्स खाली सापडलेल्या रचनांसंदर्भातील निष्कर्ष हे निकोला टेस्ला आणि क्रिस्टोफर डन सारख्या संशोधकांनी प्रस्तावित केलेल्या सिद्धांतांशी जुळणारे आहेत. टेस्ला, वीज आणि वायरलेस उर्जेवरील त्यांच्या कार्यासाठी ओळखले जातात. यामधून असं सुचवलं जात आहे की पिरॅमिड पृथ्वीच्या नैसर्गिक उर्जेचा वापर करू शकतात. ख्रिस्तोफर डन यांनी त्यांच्या ‘द गिझा पॉवर प्लांट’ या पुस्तकात, “ग्रेट पिरॅमिड भूगर्भातील कंपनांना वापरण्यायोग्य उर्जेमध्ये रूपांतरित करणारे यंत्र म्हणून कार्य करायचे,” असा दवा केला आहे.
पिरॅमिड्स का बांधले याचं गूढ वाढलं
पिरॅमिड्स 2500 इसवीसन पूर्वच्या आसपास पारंपारिक पद्धतींचा वापर करुन बांधले गेले, असं मेनस्ट्रीम इजिप्तोलॉजिस्ट म्हणतात. मात्र आता, पिरॅमिड्सच्या रचनेतील गणिती विसंगतींसह नव्याने काही संरचना सापडल्या आहेत. या संरचनांमुळे आता पिरॅमिड्सच्या खऱ्या उद्देशाबद्दल नव्याने चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.
भविष्यातील तपासासमोर आव्हाने आहेत
या प्रकल्पाअंतर्ग खाफरे येथे संशोधन करणाऱ्या गटाने भूगर्भातील संरचनेचा अधिक अभ्यास करण्यासाठी उत्खनन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र आता अशा संशोधनाला मान्यता मिळणे कठीण आहे. इजिप्तमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या पुरातत्त्वीय उत्खननावर प्रतिबंध आहे. जे पिरॅमिडच्या उत्पत्ती आणि कार्यांच्या अधिकृत खात्यांना अशी उत्खनने आव्हान देतात असं मानलं जातं. म्हणूनच अशा उत्खन्नांना परवानगी दिली जात नाही.
नव्याने सापडलेले निष्कर्ष पिरॅमिडच्या उभारणीसंदर्भातील उद्देशाविषयी मागील अनेक शतकांपासून सुरु असलेल्या वादविवादांना हातभारच लावताना दिसत आहे. पिरॅमिड्सच्या बांधकामाविषयीच्या विद्यमान प्रश्नांबरोबरच नवीन प्रश्नही निर्माण झाले आहेत. प्रस्थापित कथानकाला आव्हान देणाऱ्या उत्खननाला इजित्पमध्ये परवनगी दिली जात नाही, असं या देशाचा इतिहास सांगतो. त्यामुळेच आता हे प्राथमिक संशोधन झालं असलं तरी पुढे यामध्ये किती संशोधन शक्य आहे आणि खरोखरच पिरॅमिड्स का उभारण्यात आले याचं खरं कारण समोर येणार की नाही हे आताच सांगणं शक्य नाही.