‘XL साईजचं कंडोम आणा, हॉटेल बुक केलंय’, उद्योगपतीच्या पत्नीचा कारनामा …

दहा अब्ज डॉलर्सच्या कंपनीचे मालक प्रसन्न शंकर यांनी त्यांच्या पत्नीवर विश्वासघात, खोटे आरोप आणि त्यांच्या मुलाच्या अपहरणाचा आरोप केला आहे. त्यांनी स्वत: सोशल मीडियावर पुरावे सादर करत अनेक गुपिते उघड केली आहेत.
पत्नी दिव्या शशीधरचे विवाहबाह्य संबंध असून, यासंबंधित चॅट्स त्यांनी एक्सवर शेअर केले आहेत. तसेच आपल्या पत्नीच्या बाजूने चैन्नई पोलीस असून, आपल्याला त्रास देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तर, दुसरीकडे दिव्या शशिधरने प्रसन्नवर मुलाच्या अपहरणाचा आरोप केला आहे.
संसाराला १० वर्ष पूर्ण
प्रसन्न आणि दिव्याला ९ वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्या संसाराला १० वर्ष पूर्ण झाली. प्रसन्न टेक्नोलॉजी कंपनी सुरू करण्यासाठी अमेरिकेत राहतात. पण अलिकडेच प्रसन्नला कळले की, दिव्याचे अनुप नावाच्या पुरूषाशी विवाहबाह्य संबंध आहेत. ही माहिती अनुपच्या पत्नीकडून मिळाली होती. अनुपच्या पत्नीने दोघांचे चॅट्स आणि हॉटेल बुकिंगचा पुरावा पाठवला होता. अशी माहिती प्रसन्न दिली होती.
त्या पुराव्यामध्ये दिव्याने अनुपला मेसेज केला होता, ‘तुम्ही माझ्यासाठी XL आकाराचे कंडोम खरेदी करून ठेवू शकता का? या मेसेजला उत्तर देऊ नका. मी आत्ताच हा मेसेज डिलीट करत आहे’, असा स्क्रिनशॉट प्रसन्नने ट्वीटद्वारे शेअर केलं आहे. तसेच हॉटेल बुकिंगचा स्क्रिनशॉटही त्याने शेअर केला आहे.
पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचं समजताच दोघांनी घटस्फोटसाठी अर्ज दाखल केला. पण पोटगीच्या रकमेवर दिव्या नाराज असल्याची माहिती प्रसन्नने दिली. त्यानंतर दिव्याने प्रसन्नवर खोटी तक्रार दाखल केली.
तिच्यावर बलात्कार आणि तिचे नग्न व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप दिव्याने प्रसन्नवर केला. तिने हे आरोप सिंगापूरमध्ये केले होते. त्यानंतर सिंगापूर पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीत सिंगापूर पोलिसांनी प्रसन्नला मुक्त केले.
प्रसन्नने त्यानंतर भारतात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. पण अधिकचे पैसे लाटण्यासाठी दिव्याने अमेरिकेत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. नंतर घटस्फोटाच्या खटल्यात मदत करण्यासाठी दिव्याने मुलाला पळवून नेले. त्यानंतर प्रसन्नने दिव्यावर त्यांच्या मुलाचे अपहरण केल्याचा आरोप केला. पण त्यानंतर प्रसन्नने आपल्या मुलाला परत आणले. आता दिव्याने प्रसन्नवर मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, प्रसन्न यांनी त्यांच्याकडे मुलगा सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे.