Video : अवकाशातून जमिनीवर पडला ढगाचा तुकडा, पाहून सर्वांनाच बसला आश्चर्याचा धक्का; डोळ्यात साठवून ठेवणारे दृश्य ..

सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे अनेक आश्चर्यकारक प्रकार शेअर केले जातात ज्यांना आपण याकधीही पाहिले नसेल. हे दृश्य नेहमीच आपल्या कल्पनेपलीकडचे असते.
आताही इथे असाच एक व्हिडिओ शेअर झाला आहे ज्यातील दृश्ये तुम्हाला भारावून टाकतील. निसर्गाच्या आश्चर्यकारक चमत्काराचा व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे. आता यात नक्की असं काय दिसलं… चला ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये काही लोक रस्त्यावर उभे असल्याचे दिसून येत आहे. यावेळी त्यांच्या समोरील डोंगरांचे विहंगम दृश्य आपल्या नजरेस पडते. त्यानंतर व्हिडिओमध्ये एक विचित्र घटना घडताना दिसते ज्यात ढगाच्या आकाराची वस्तू आकाशातून हळूहळू खाली येताना दिसते. काही क्षणातच ती वस्तू जमिनीवर पडते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल मात्र अवकाशातील ढगाचा तुकडा यावेळी जमिनीवर पडलेला असतो. हा तुकडा जमिनीवर पडताच लोक ते पाहायला तिथे गर्दी करतात. हे अनोखे दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
याआधी कधीही असे हे अद्भुत दृश्य नजरेस न पडल्याने लोक आता या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. व्हिडिओतील हे दृश्य आता खरे आहेत की खोटे याबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आली नाही.
हे अद्भुत दृश्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @the_viralvideos नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. ‘ढगाचा एक टुकडा’ या कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्समध्ये यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे अलौकिक आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ढगाचा तुकडा जमिनीवर आलाय?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे खरं आहे का?”.
टीप – हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.