Video : ‘जैसे संसद में हो एक जहरीला सांप..’कुणाल कामरानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही रचलं गाणं..

स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचून टीका करणं चांगलंच भोवलंय. कुणालने एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता टीका केली.
कुणाल कामराचं मुख्यमंत्री फडणवीसांवरील गाणं जसंच्या तसं..(VIDEO)
मुख्यमंत्री को देखा तो ऐसा लगा,
जैसे जलता गुजरात, जैसे मनीपूर में रात.
जैसे नफरत की बात, जैसे बांटे हो नोट.
जैसे छिने हो व्होट, जैसे मन में हो खोट.
जैसे व्होट लेके हमसे वादे भूल गया..
मुख्यमंत्री को देखा तो ऐसा लगा,
जैसे काला हो मन, जैसा लूटा हो धन.
जैसे भगवा हो रंग, जैसे मन में हो संघ.
जैसे पार्टी में कलेश, जैसे बेचा हो देश.
जैसे संसद में हो एक जहरीला सांप..
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं सादर केलं होतं. या प्रकरणावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. या प्रकरणात कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत मोठा इशारा दिला आहे.
‘स्टॅण्डअप कॉमेडी करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कुणालाही नाही. अशा प्रकारे खालच्या स्थराची कॉमेडी करून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अनादर करण्याचा अधिकार कुणालाही नाही. हे चुकीचं आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.