आरोग्य

पोटातील आतडयांना सूज आल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ भयानक लक्षणे, घरगुती उपाय करून घ्या आरोग्याची काळजी


शरीराचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी सतत काहींना काही केले जाते. कधी आहारात होणारा बदल, पौष्टिक पदार्थांचे सेवन इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात.

मात्र तरीसुद्धा पचनसंबंधित समस्या उद्भवू लागतात. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, पोषक तत्वांचा अभाव, व्यायामाची कमतरता, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर आणि पचनक्रियेवर दिसून येतो. पचनसंस्था बिघडल्यानंतर आतड्यांमध्ये होणारी जळजळ, पोटासंबंधित समस्या इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. पचनासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. आतड्यांसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये सामान्य लक्षणे दिसू लागतात.

 

आतड्यांसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीरात वारंवार अपचन, पोटदुखी, गॅस, जुलाब किंवा थकवा इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. याशिवाय आतड्यांमध्ये जळजळ होण्यास सुरुवात झाल्यानंतर शरीरात पचनासंबंधित समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आतडयांना सूज आल्यानंतर शरीरात कोणती गंभीर लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.

 

आतड्यांमध्ये सूज आल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. सतत पोटात दुखणे, गॅसचा त्रास होणे, वारंवार जुलाब किंवा बद्धकोष्ठतेची सतत समस्या उद्भवत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. आतडयांना सूज आल्यानंतर खाल्ले अन्नपदार्थ पचण्यास अनेक अडथळे निर्माण होतात. याशिवाय वजन कमी होण्याची शक्यता असते. शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात थकवा किंवा अशक्तपणा जाणवू लागतो.

 

आतडयांना सूज आल्यानंतर वारंवार पोटात दुखणे किंवा गॅस, अपचनाची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. याशिवाय सूज आल्यानंतर शरीराला अन्नपदार्थ व्यवस्थित पचवता येत नाहीत. तसेच पोटाला सूज आल्यानंतर शरीरात अनेक बदल जाणवू लागतात. याशिवाय वजन वाढल्यासारखे भासू लागते.

 

शरीरात सतत होणाऱ्या बदलांकडे सतत दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते. या बदलांकडे दुर्लक्ष केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात. हे पदार्थ शरीरात तसेच साचून राहिल्यामुळे शौचाच्या समस्या उद्भवतात. यामुळे अनेकांना बद्धकोष्ठतेचची समस्या उद्भवते.

 

आतड्यांसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर त्वचेवर सुद्धा परिणाम दिसून येतो. त्वचा कोरडी पडणे, चेहऱ्यावर किंवा शरीरावर पुरळ येणे, पिंपल्स येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात. शरीराला योग्य प्रमाणात पोषण न मिळाल्यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवण्याची शक्यता असते.

आतडयांना आलेली सूज कमी करण्यासाठी दैनंदिन आहारात दही, हळद, ओमेगा-३ युक्त पदार्थ, ग्रीन टी, फायबरयुक्त भाज्या आणि फळे इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे पचनसंस्था सुधारते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button