‘…म्हणून मी त्याला मारलं पण चूक झाली’ खोक्या भोसले अखेर आला समोर अन …

बीड : बीडमधून एका व्यक्तीला अमानुष मारहाणाची व्हिडीओ समोर आल्यामुळे खळबळ उडाली. हा व्हिडीओ भाजपचा भटक्या विमुक्त आघाडीचा प्रदेश पातळीवरील पदाधिकारी सतीश भोसले याचा असल्याचं उघड झालं.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भोसले समोर आला असून ‘तो मी नव्हेच’ असा दावा केला आहे. हा व्हिडीओ अडीच वर्ष जुना आहे. छेडछाडीच्या कारणातून मारहाण केली होती, असं स्पष्टीकरण भोसलेनं दिलं आहे.
भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसलेने बीडमध्ये एका व्यक्तीला अमानुषपणे मारहाण केलेला एक व्हिडीओ दिवसभर व्हायरल झाला होता. आपला व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसले समोर आला.
“सदरील व्हिडीओ चुकीचा असून तो दोन वर्षांपूर्वीचा आहे. माझ्या मित्राच्या कुटुंबातील महिलेची छेड काढल्याने मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि मारले. मला राग अनावर झाला नाही त्यामुळे मी त्याला मारहाण केली. त्या महिलेने सांगितलं. त्यामुळे मी त्याला तिथे मारहाण केली होती, अशी कबुली भोसलेनं दिलं.
त्या व्यक्तीने माझ्या मित्रांची दहा लाखाला फसवणूक केली आहे. संबंधित पीडित व्यक्ती हा तो व्यवहार मिटवण्यासाठी मित्राच्या घरी आला होता. मात्र त्याने त्याच्या पत्नीची छेड काढली होती. त्यामुळे हे मला ऐकून राग आला, त्यानंतर मी त्याला मारहाण केली होती. मला तेव्हा पोलीस स्टेशनला जाण्यासाठी वेळ मिळाला नाही, असंही भोसलेनं सांगितलं.
‘मी एक छोटा कार्यकर्ता आहे. पारधी समाजातून मी आलो आहे. माझा समाज हा दुर्मीळ आहे. पण हा व्हिडीओ पूर्ण चुकीचा आहे. त्याची सत्यता पाहात. इतर विषय झाकण्यासाठी हे केले जात आहे. माझी विनंती मी त्याला मारहाण केली मी चुकलो आहे, त्या चुकीबद्दल मी माफी मागतो, असंही भोसले म्हणाला.
काय आहे प्रकरण?
हा व्हिडीओ एक ते दीड वर्ष जुना असल्याचं बोललं जात आहे. राधेश्याम भोसले असं पीडित व्यक्तीचं नाव आहे. कौटुंबिक वादातून सतीश भोसलेकडून अमानुष मारहाण केली होती. सतीश भोसले(उर्फ खोक्या, पार्टी) हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. पण या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र मारहाण करत असताना अत्यंत अमानुष पद्धतीने तळपायावर बॅटच्या साह्याने मारले जात आहे. विशेष या व्यक्तीचे कपडे काढून मारहाण केली होती. हे अत्यंत धक्कादायक असून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.