200 कोटींच्या घोटाळ्याचा नवा सनसनाटी आरोप; मंत्री मुंडेंनी दमानियांचा सगळा इतिहासच काढला

बीड : गेल्या काही दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यातला संघर्ष टोकाला पोहोचला आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणावरुन अडचणीत आणल्यानंतर दमानिया यांनी मुंडेंच्या कृषिमंत्री काळातील दुसरा आणखी एक मोठा बाहेर काढला आहे.
धनंजय मुंडे हा भ्रष्ट माणूस आहे, त्याला कोणत्याही पदावर बसण्याचा अधिकार नाही.इफ्कोमध्ये महाघोटाळा केला आहे. यातून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) वाचूच शकत नाही शकणार नाही असा गंभीर आरोप केल्यामुळे पुन्हा मुंडेंभोवती संशयाचं धुकं दाटलं. पण आता मंत्री धनंजय मुंडे यांनी दमानिया यांच्या सनसनाटी आरोपांवर प्रतिक्रिया देतानाच दमानिया यांचा इतिहासच काढला आहे.
इतके दिवस जरा जपून प्रतिक्रिया देत असलेल्या मंत्री व राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंनी आता अंजली दमानिया (Anjali Damania ) यांच्या आरोपांवर जोरदार पलटवार केला आहे.ते म्हणाले, अंजली दमानिया यांनी गेल्या पंधरा वर्षांत ज्या काही मीडिया ट्रायल रन केल्या,ज्या कोणाविरुद्ध आरोप केले, त्यातील एकही आरोप अद्याप कोणत्याही न्यायालय अथवा इतरत्र कोठेही सिद्ध होऊ शकलेला नाही. त्याचेही कारण अर्धवट माहिती हाच असल्याची टीका त्यांनी केली.
तसेच एखाद्या विषयांस मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेअंती मान्यता झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केल्यानंतर राज्यातील सर्वोच्च आयएएस अधिकारी असलेल्या माननीय मुख्य सचिव यांच्या स्वाक्षरीने निर्गमित केले जातात.मात्र, दमानिया यांनी या प्रक्रियेची माहिती घेतली असती तर असे निराधार आणि धादांत खोटे विधान कदापि केले नसते, असं सांगत त्यांनी एकप्रकारे दमानिया यांचे आरोपचे खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे
मुंडे म्हणाले, अंजली दमानिया या ऑफिस ऑफ प्रॉफिट पासून ते काहीही तथ्य नसलेल्या घोटाळ्यांचे कोणते तरी अर्धवट कागद समोर दाखवून त्याला पुरावा म्हणत आहेत आणि मीडिया ट्रायल रन करत आहेत.पण हा त्यांचा व्यवसायच झालेला आहे. त्यासंदर्भात त्यांच्याकडे काँक्रिट कागदपत्रं असल्यास त्यांनी न्यायालयात जावं,आता न्यायालयामध्ये आम्ही देखील त्यांना योग्य तो धडा शिकवू असा इशाराही मुंडेंनी यावेळी दिला आहे.
धनंजय मुंडेंनी आता थेट मुद्द्यालाच हात घालताना फर्टीलायझर कंट्रोल ऑर्डर हा केंद्र शासनाचा कायदा असून त्यानुसार विशिष्ट प्रमाणपत्रं धारण केल्याशिवाय व खत निर्माता कंपनीने प्राधिकृत केल्याशिवाय कोणालाही खतांची विक्री करता येत नाही. याविषयी IFFCO ने संबंधित कंपन्यांना 2022 व 2023 मध्ये सुद्धा नोटीस दिली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
पण आपल्या सोयीचे तेवढे बोलायचे आणि अर्धवट ज्ञान प्रदर्शन करणे हे धोरण फक्त बदनामीसाठी आहे.मंत्रिमंडळाचा निर्णय झाला किंवा नाही असे भासवून निर्णय होत नाही, भासवून गोष्टी करण्यासाठी ती अंजली दमानिया यांची प्रेस कॉन्फरन्स आहे का,असा सवालही धनंजय मुंडेंनी उपस्थित केला आहे.
अंजली दमानिया यांचे नेमके आरोप काय…?
मंत्रिमंडळाने कोणताही निर्णय घेतलेला नसताना देखील मंत्री मुंडे यांनी खोटे आदेशाने कार्यवाही करण्याचा लेखी आदेश दिला,असा दावा अंजली दमानिया यांनी केला.तसेच पूर्वीचा 342 कोटींचा, हा अॅडिशनल 200 कोटी रुपयांचा घोटाळा आहे.त्यामुळे मंत्री मुंडे यांची मंत्रिपदावर बसण्याची पात्रता नाही. इतका भ्रष्ट माणूस, मंत्रिमंडळाचा निर्णय झाला, असे दाखवून जर भ्रष्टाचार करत असेल, तर असा मंत्री कधीही झाला नाही पाहिजे.कृषी तर नाहीच नाही.आता तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाई करावी,अशी मागणीही दमानिया यांनी केली होती.