राजकीय

मंत्रीपद काय आमदारकीच धोक्यात? धनंजय मुंडेंना कोर्टाचा दणका; बजावली कारणे दाखवा नोटीस


विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडविल्याबाबत करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या ऑनलाइन तक्रारीच्या अनुषंगाने परळीच्या फौजदारी न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे.

याबाबत २४ फेब्रुवारी २०२५ रोजी परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे तक्रारदाराचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी दाखल उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा मुंडे यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता.

परंतु करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता. त्यांनी वरील खरी माहिती दडविल्याबाबत करुणा मुंडे यांनी बीड येथून परळीच्या फौजदारी न्यायालयात ऑनलाइन तक्रार केली होती. तक्रारीची मूळ कागदपत्र पाच फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर दाखल केली.

मागील महिन्यात,कोर्टाच्या सुनावणीदरम्यान, घरगुती हिंसाचार प्रकरणात मुंडे दोषी ठरले आहेत. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप कोर्टाने अंशत: मान्य केले असून दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश फॅमिली कोर्टाने दिले आहेत.

मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि ३ मुली तसेच करुणा मुंडे यांच्या २ मुलांचा उल्लेख केला होता. मात्र, करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button