परळीत चार राखेची तळी,राखेवरून आरोपांचा ‘फुफाटा’; धनंजय मुंडेंनीच सांगितलं 19 वर्षाचं सत्य?
बीड : मस्साजोगचे सरपंच यांचे अपहरण आणि हत्येमुळे बीड जिल्ह्याचे काळं सत्य समोर आले. वाल्मिक कराडच्या अटकेनंतर आता बीडच्या औष्णिक ऊर्जा केंद्रातील राख उचलण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी स्थानिक पुढाऱ्यांच्या राजकीय वरदहस्तामुळे ही राख बेकायदेशीरपणे नेली जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता, यावर मंत्री धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिले आहे. ऊर्जा विभागाने समोर येऊन ही राख घेऊन जाणे बेकायदेशीर आहे असे सांगावे, असे धनंजय मुंडे म्हणाले. तसेच मीडिया ट्रायल करुन राजकीय आणि जीवन सोपं नाही, असे देखील ते म्हणाले.
धनंजय मुंडे म्हणाले, परळीच्या थर्मल पॉवर स्टेशनने कोळसा वापरुन जी घाण केली आहे. ती घाण थर्मल स्टेशने पैसे देऊन काढावी, असं सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिली आहे. ते काय शासकीय पद आहे का की मी तिथं माझ्या बायोकला बसवलं आहे. ती 2006 ची कंपनी आहे.आज राखेमुळे तिकडे सिमेंट कंपनी आली, त्यामुळे रोजगार आला आहे.
राख घेऊन जाणे बेकायदेशीर हे ऊर्जा विभागाने सांगावे : धनंजय मुंडे
परळीच्या औष्णिक प्रकल्पामुळे राखेचे तळे साचले होते. आमच्याकडे अशी दोन- तीन तळे आहेत ती साफ करायला नको का? असा सवाल धनंजय मुंडेंनी केला. पुढे ते म्हणाले, राखेच्या तळ्यांमुळे एप्रिल – मे महिन्यात आमची परळी धुळीत, राखेत दिसते. त्यावर पण यांनी आरोप केले आहे. ऊर्जा विभागाने समोर येऊन ही राख घेऊन जाणे बेकायदेशीर आहे. याचा अर्थ आम्ही शांत बसलो असं समजू नका… आम्हाला बोलता येतं, असे देखील धनंजय मुंडे म्हणाले.
राजकीय आणि सामाजिक जीवन संपवणे सोपं नाही : धनंजय मुंडे
धनंजय मुंडे म्हणाले, बीड जिल्ह्यात अतिशय संवेदनशील घटना घडली आहे. त्या घटनेचे हत्यारे त्यांना फासावर लटकवणे आमची जबाबदारी आहे. माझी अंजली ताई बदानामी यांना सातत्याने आरोप करण्याचे काम कोणी दिले असेल त्यांना शुभेच्छा आहे. खोटे आरोप करुन सनसनाटी निर्माण करणे. तसेच एखाद्याचा मीडिया ट्रायल करुन राजकीय आणि सामाजिक जीवन संपवणे सोपं नसते.