खोटं बोलणाऱ्या व्यक्ती कशा ओळखाल?, ‘या’ 10 खुणा नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला अनेकदा जाणवते की समोरची व्यक्ती आपल्याशी प्रामाणिक आहे की नाही. कुणी आपल्याला फसवत तर नाही ना, किंवा त्याच्या मनात नक्की काय चाललंय, हे समजून घेण्याची इच्छा आपल्याला होते.
अशावेळी, मानसशास्त्रातील काही तंत्रे आणि हावभावांचे निरीक्षण करून आपण समोरच्याचे सत्य-असत्य ओळखू शकतो. (Psychological Tricks)
१) बोलण्याची पद्धत बदलते का?
जेव्हा एखादी व्यक्ती खोटं बोलते, तेव्हा तिच्या बोलण्याच्या पद्धतीत वेगळेपणा दिसून येतो.
ती अनावश्यक तपशील सांगते किंवा तिच्या बोलण्यात विसंगती दिसून येते.
आवाजाच्या गतीत फरक पडतो – तो अति वेगवान किंवा अति संथ होतो.
सत्य बोलणारी व्यक्ती स्पष्ट आणि सरळ उत्तर देते.
२) शरीरभाषेवर (Body Language) लक्ष ठेवा
एखादी व्यक्ती जर वारंवार हात लपवत असेल, पाय हलवत असेल किंवा खुर्चीत अस्वस्थ वाटत असेल, तर ती काहीतरी लपवत असेल.
आत्मविश्वासू व्यक्ती सरळ उभी राहते, उघड्या हातांनी संवाद साधते आणि नर्व्हस वाटत नाही.
३) खोटं आणि खरं हास्य कसं ओळखाल?
खऱ्या हास्यामुळे डोळ्यांच्या बाजूला सुरकुत्या दिसतात.
खोटं हास्य फक्त तोंडापुरतं मर्यादित राहतं आणि त्यात डोळ्यांचा सहभाग नसतो.
जर कोणी फक्त ओठांनी हसत असेल आणि डोळे थंड राहतील, तर तो खोटं वागत आहे. (Psychological Tricks)
४) डोळ्यांची स्थिती आणि हालचाल
सत्य बोलणारी व्यक्ती तुमच्या डोळ्यात थेट नजर टाकते.
खोटं बोलणारी व्यक्ती नजर टाळते, सतत इतरत्र बघते किंवा डोळ्यांची जास्त हालचाल करते.
मात्र, काही हुशार लोक मुद्दाम नजर न हटवता खोटं बोलतात, त्यामुळे इतर लक्षणांकडेही लक्ष द्यावं.
५) हातांचे हावभाव काय सांगतात?
जेव्हा कोणी खोटं बोलतो, तेव्हा त्याचे हात नियंत्रणात नसतात.
तो हात वारंवार कपाळावर नेतो, मान किंवा गळा चोळतो, किंवा तळहात लपवतो.
सत्य बोलणारी व्यक्ती हात नैसर्गिक हालचालींमध्ये ठेवते.
६) प्रश्नांची उत्तरे किती ठाम आणि स्पष्ट असतात?
खोटे बोलणारी व्यक्ती अस्फष्ट आणि गोलमोल उत्तरं देते.
तिला जर त्याच विषयावर पुन्हा प्रश्न विचारला, तर ती गोंधळून जाते किंवा उत्तर बदलते.
सत्य बोलणारी व्यक्ती थेट, स्पष्ट आणि आत्मविश्वासाने उत्तर देते.
७) अंतर राखणे आणि टाळण्याची सवय
जर एखादी व्यक्ती तुमच्या जवळ येण्यास कचरते, संवाद टाळते किंवा अस्वस्थ वाटते, तर ती काहीतरी लपवत असेल.
सत्य सांगणारी व्यक्ती स्वतःहून संवाद साधते आणि वागण्यात मोकळीक ठेवते. (Psychological Tricks)
८) अंतर्मनाचा आवाज ऐका
आपल्या मेंदूला काही गोष्टी नकळत समजतात.
जर एखाद्याच्या बोलण्यात किंवा हावभावात काहीतरी विचित्र वाटत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
९) सूक्ष्म भाव (Microexpressions) ओळखा
चेहऱ्यावर काही क्षणभर येणारे भाव आपल्याला सत्य दर्शवू शकतात.
उदाहरणार्थ, कोणी हसत असताना जर त्याच्या चेहऱ्यावर एका क्षणासाठी भीती, राग किंवा अस्वस्थता दिसली, तर तो काहीतरी लपवत आहे.
१०) बोलण्यात विरोधाभास आहे का?
खोटे बोलणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्यात विरोधाभास असतो.
समजा, त्याने सांगितले की तो काल घरी होता, पण थोड्या वेळाने तो म्हणतो की तो मित्रासोबत बाहेर गेला होता, तर तो खोटं बोलत आहे.