अतूट नात्यासाठी मॅच्युरिटी गरजेची, कशी ओळखाल तुमच्या नात्यातील परिपक्वता? हे आहेत 5 संकेत
प्रेम, नातं, लग्न आणि नंतर दुरावा, भांडणं आणि आरोप-प्रत्यारोप हे प्रत्येक घरात दिसून येतं. अशा परिस्थितीत, काही नाती काचेसारखी कालांतराने तुटून जातात, तर काही नाती हिऱ्यासारखी कठोर आणि परिपक्व बनतात.
प्रेम व्यतिरिक्त, या परिपक्व नात्यात प्रामाणिकपणा, विश्वास, एकमेकांबद्दल आदर आणि त्या सर्व गोष्टी असतात, ज्या नात्याला मजबूत करण्याचे काम करतात. मानसशास्त्रज्ञ प्रीती सेठी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की नात्यात परिपक्वता आहे की नाही, ते कोणत्या गुणांनी ओळखता येते. तर जाणून घेऊया की, आपण कसे ओळखू शकतो की आपल्या नात्यात आतापर्यंत परिपक्वता आली आहे की नाही.
नात्यातील परिपक्वता कशी ओळखावी?
गप्पा मारणे कंटाळवाणे वाटते : जर तुमचे नाते परिपक्व झाले असेल, तर लोकांना काय वाटते याची तुम्हाला पर्वा नसते. तुमचं जग तुमच्या पार्टनरभोवती फिरत असतं, त्यामुळे लोक इतरांबद्दल काय बोलत आहेत याचा तुमच्यावर परिणाम होणं थांबतं.
वेळेचं महत्त्व : तुम्हाला हळू हळू तुमच्या वेळेचं महत्त्व समजू लागतं आणि वेळ तुमच्यासाठी खूप मौल्यवान गोष्ट बनते. तुम्ही वेळ वाया घालवणं टाळायला सुरुवात करता आणि नाती टिकवण्यासाठी वेळ काढणं तुमच्यासाठी महत्त्वाचं बनतं.
कारणे न सांगणे : जर तुम्ही गंभीर नात्यात असाल आणि तुमचं नातं खूप परिपक्व झालं असेल, तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी कारणं सांगण्याची गरज नाही आणि तुम्ही समस्यांना अगदी सहजपणे तोंड देऊ शकता.
बोलण्यापेक्षा जास्त ऐकणे : जर तुम्हाला असं वाटत असेल की, या दिवसात तुम्ही दोघेही एकमेकांना खूप बोलण्याऐवजी लक्ष देऊन ऐकणं अधिक महत्त्वाचं मानता आणि तुमच्या पार्टनरने जे काही सांगितलं ते ऐकणं महत्त्वाचं वाटत असेल, तर ते तुमच्या नात्यात परिपक्वता आल्याचं लक्षण आहे.
स्वतःवर प्रेम : जर तुमचं नातं परिपक्व असेल, तर तुम्ही तुमच्या व्यस्त जीवनातही स्वतःसाठी वेळ काढाल आणि तुमच्या पार्टनरच्या आयुष्यात जास्त हस्तक्षेप करणं टाळाल. याशिवाय, तुम्ही स्वतःची काळजी घेण्यालाही प्राधान्य द्याल. अशा प्रकारे तुम्हाला स्वतःवरच्या प्रेमावर विश्वास वाटू लागेल.