धनंजय मुंडेंच्या टोळीने श्रद्धास्थानाला कलंक लावला, मनोज जरांगेचा घणाघात
बीड : मनोज जरांगे पाटलांनी वाल्मिक कराडच्या बाबत गौप्यस्फोट केलाय. विधानसभा निवडणुकीच्या आधी धनंजय मुंडेंसोबत वाल्मिक कराड भेटीला आला होता, अशी माहिती जरांगेंनी दिलीय. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय.मनोज जरांगे पाटलांच्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.
जरांग पाटलांनी केलेला या गौप्यस्फोटाचा संबंध मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीसोबत असल्याचं पाहायला मिळतंय. तसेच धनंजय मुंडेंची मोठी टोळी आहे. धनंजय टोळीमुळे मान खाली घालून जगण्याची वेळ आली आहे. टोळीनेच श्रद्धास्थानाला कलंक लावला असेल, असेही जरांगे म्हणाले.
धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडची ओळख करून दिली, जरांगेंनी सांगितला मध्यरात्रीच्या भेटीचा किस्सा, कृष्णा आंधळेला लपवून ठेवल्याचाही आरोप केला आहे. निवडणुकीपूर्वी धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडसोबत माझी भेट घेतली होती. मुंडेंनीच कराडची ओळख करून दिली होती, असा गौप्यस्फोट मनोज जरांगेंनी केला आहे.
नेमकं काय घडलं?
धनंजय मुंडे मला भेटायला आले त्यांच्या सोबत वाल्मिक कराड सुद्धा होते..रात्री 3 च्या दरम्यान भेटले मी झोपलो होतो. पण दारावर आलेल्या माणसांना परत पाठवणे माझ्या रक्तात नाही म्हणून मी त्यांना भेटलो. त्या काळात अनेक दिगग्ज नेते मला भेटून निवडणुकीत मदत करा अशी विनंती करत होते, तेच धनंजय मुंडे यांनी केले. बाकी त्यांनी काय केल हे सांगणे आता उचित होणार नाही. मला ते ते सांगणे योग्य वाटत नाही असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. धनंजय मुंडे म्हणाले, मला आजपर्यंत मराठ्यांनी खूप मदत केली म्हणून मी मोठा झालो. आता मात्र तेच आमची माणसे कापत आहेत असेही जरांगे म्हणाले.