आरोग्य

जास्त शारीरिक संबंध ठेवण्याचे फायदे आणि तोटे,संतुलन कसे राखावे?


शारीरिक संबंध हे निसर्गदत्त प्रक्रिया असून ते केवळ आनंदासाठीच नव्हे, तर मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्यासाठी देखील महत्त्वाचे आहेत. मात्र, अति शारीरिक संबंध ठेवण काहीवेळा शरीरावर नकारात्मक परिणाम करू शकते.

म्हणूनच, संतुलन राखणे आवश्यक आहे.

जास्त शारीरिक संबंध ठेवण्याचे फायदे

 

 

1. तणाव कमी होतो आणि मन शांत राहते

शारीरिक संबंधादरम्यान ऑक्सिटोसिन आणि एंडॉर्फिन हार्मोन्स स्रवतात, जे नैराश्य, चिंता आणि तणाव कमी करतात. त्यामुळे तुम्ही अधिक आनंदी आणि शांत वाटता.

2. रक्ताभिसरण सुधारते आणि हृदय निरोगी राहते

नियमित लैंगिक संबंधांमुळे रक्ताभिसरण चांगले होते, रक्तदाब संतुलित राहतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.

3. रोगप्रतिकारक शक्ती वाढते

संशोधनानुसार, आठवड्यात २-३ वेळा लैंगिक संबंध ठेवल्यास इम्युनोग्लोबिन-A (IgA) या अँटीबॉडीची पातळी वाढते, ज्यामुळे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता कमी होते.

 

 

4. झोपेची गुणवत्ता सुधारते

शारीरिक संबंधानंतर मेलाटोनिन आणि प्रोलॅक्टिन हार्मोन्स स्रवतात, जे चांगली झोप लागण्यास मदत करतात.

5. नात्यात प्रेम आणि आत्मियता वाढते

नियमित आणि समाधानकारक लैंगिक संबंधांमुळे जोडीदारांमधील प्रेम आणि विश्वास अधिक दृढ होतो.

 

शारीरिक संबंधामुळे होणारे दुष्परिणाम

1. शरीरात थकवा आणि ऊर्जा कमी होते

सतत लैंगिक संबंध ठेवल्यास शरीरातील प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे जास्त प्रमाणात खर्च होतात, ज्यामुळे थकवा जाणवतो आणि स्नायूंमध्ये वेदना होतात.

2. वीर्यनिर्मितीवर परिणाम होतो

पुरुषांमध्ये अतिसंभावनामुळे वीर्यनिर्मिती मंदावू शकते, शुक्राणूंची गुणवत्ता कमी होऊ शकते आणि कामेच्छा कमी होण्याची शक्यता असते.

 

3. लैंगिक अवयवांवर ताण येतो

वारंवार लैंगिक संबंधांमुळं पुरुषांमध्ये लिंगावर तणाव येणे, वेदना होणे, जळजळ होणे किंवा इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
महिलांमध्ये योनीला जळजळ, कोरडेपणा किंवा दुखणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

4. मानसिक थकवा आणि चिडचिड वाढते

जास्त लैंगिक संबंध ठेवल्यास काहींना मानसिक थकवा आणि चिडचिडेपणा येऊ शकतो. त्यामुळे लैंगिक इच्छा कमी होण्याची शक्यता असते.

 

 

5. हॉर्मोनल असंतुलन होण्याची शक्यता

शरीरातील टेस्टोस्टेरॉन (Testosterone) आणि डोपामिन (Dopamine) यांचे संतुलन बिघडल्यास कामवासना कमी होऊ शकते किंवा शरीरात इतर हॉर्मोनल बदल होऊ शकतात.

संतुलन कसे राखावे?

स्वतःच्या क्षमतेनुसार सेक्स करा. थकवा किंवा शरीरावर ताण येत असेल तर विश्रांती घ्या.
पौष्टिक आहार घ्या. (बदाम, दूध, केळी, अंजीर, खजूर, डाळिंब)
योग आणि व्यायाम करा, जेणेकरून शरीर निरोगी राहील.
शरीरातील पाणी आणि खनिजांची पूर्तता करा.

जोडीदाराशी संवाद ठेवा आणि गरजा समजून घ्या.
वीर्य वाया जाणार नाही याची काळजी घ्या. संतुलित लैंगिक जीवन महत्त्वाचे आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button