आधी एकत्र दारू प्यायले, नंतर पत्नीची रस्त्यातच वेगळीच मागणी; नकार दिल्याने पतीला धू धू धुतले!
दारू प्यायल्यानंतर माणूस काय करतोय, काय बोलतोय हेच कळत नाही. तुम्ही अनेकदा लोकांना दारू पिऊन गोंधळ घालताना पाहिलं असेल. काही लोक दारू पिऊन रस्त्यावर गोंधळ घालताना दिसतात. अशीच एक घटना राजस्थानच्या सिरोहीमधून समोर आली आहे.
जिथे दारूच्या नशेत एका महिलेने पतीला रस्त्यातच मारहाण केली. यावेळी त्याच्याभोवती लोकांचा जमाव जमला.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण सिरोहीमधलं आहे. जिथे पती-पत्नीने एकत्र येऊन दारूची पार्टी केली. दोघांनीही एवढं मद्यपान केलं की आपण काय करतोय, हेही कळत नव्हतं. दारू पिऊन पती-पत्नी दोघेही पायी जात असताना रस्त्यावर बसले. पत्नीला जास्तच झाली होती. रस्त्यात बसून तिने पतीला ते चखना आणण्याची विनंती केली.
दोघे पती-पत्नी रस्त्यावर बसले. लोक दोघांचे ये-जा पाहत होते, पण त्यांना कोणाचीच पर्वा नव्हती. दरम्यान, पत्नीने पतीला चखना घेण्यास सांगितले असता पतीने ते देण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. पत्नीने पतीला खूप सांगितले आणि चखन्यासाठी पैसे मागत राहिली. पण नवऱ्याला ते मान्य नव्हते. या प्रकरणावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली.
यानंतर पत्नीने पतीला बेदम मारहाण केली. तिने रस्त्यातच नवऱ्याला चापट मारायला सुरुवात केली. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची होऊन जोरदार हाणामारी झाली. ते पती-पत्नीचे परस्पर संबंध आहे, असे तेथून जाणाऱ्या लोकांना वाटत होते. परंतु त्या दोघांच्या बोलण्यातून ते दारूच्या नशेत असल्याचेही लोकांना समजले. यावरून दोघांमध्ये काही काळ जोरदार खडाजंगी झाली. त्यानंतर दोघेही दारूच्या नशेत असताना रस्त्यावरून उठून आपल्या घरी गेले.