नवऱ्याची किडनी १० लाखांत विकली अन् बॉयफ्रेंडसोबत बायको झाली फरार …
महिलेने तिच्या पतीला त्याची किडनी विकण्यास भाग पाडले आणि नंतर ते पैसे घेऊन प्रियकरासोबत पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेने आपल्या पतीला मुलीच्या शिक्षणासाठी किडनी विकणे योग्य आहे हे पटवून दिले अन् त्याने तिच्यावर विश्वास ठेवून १० लाखांत किडनी विकली.
महिलेने ते पैसे स्वत:कडे घेतले अन् रात्रीच प्रियकरासोबत फरार झाली. पतीने महिलेविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पश्चिम बंगालमधील हावडामध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हावडा जिल्ह्यातील संकरेल येथे ही घटना घडली. इथे एका पेंटरला घर आहे. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि १० वर्षांची मुलगी आहे. त्याच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्याचे उत्पन्न पुरेसे नव्हते. म्हणून पत्नीने पतीला म्हटले – तुझी किडनी विक. यामुळे आमच्या आर्थिक समस्या सुटतील. नवरा म्हणत होता की, अर्थातच सध्या आपले तेवढे उत्पन्न नाही. पण नंतर सगळं ठीक होईल त्यासाठी किडनी विकायची गरज नाही.
पण त्याची पत्नी त्याच्यावर त्याची किडनी विकण्यासाठी सतत दबाव आणत होती. ती म्हणाली – तुमचे काम एका किडनीनेही होईल. पण जर पैशाअभावी आमच्या मुलीचे भविष्य घडवता आले नाही तर ती तुमची चूक असेल. तुमच्या मुलीचे भविष्य उध्वस्त करण्यासाठी तुम्हीच जबाबदार असाल. यामागे पत्नीचा काय हेतू होता हे पतीला माहित नव्हते. आपल्या मुलीचे भविष्य लक्षात घेऊन, त्याने आपली किडनी विकण्यास सहमती दर्शविली.
पेंटरने किडनी खरेदी करणाऱ्याचा महिनाभर शोध घेतला. एका महिन्यानंतर, त्याची किडनी १० लाख रुपयांना विकली गेली. दोघेही पती-पत्नी मिळून किडनी खरेदी करणाऱ्या व्यक्तीकडे गेले आणि पैसे घेऊन आले. यानंतर पत्नी म्हणाली की मला हे पैसे द्या. मी सकाळ होताच ही रक्कम बँकेत जमा करेन. पतीने विश्वासाने ते पैसे त्याच्या पत्नीला दिले. पण पत्नी रात्रीतून घरातून पळून गेली. काही दिवसांनी, जेव्हा पतीला कळले की त्याची पत्नी बराकपूरच्या सुभाष कॉलनीत रविदास नावाच्या एका पुरूषासोबत राहत आहे, तेव्हा तो त्याच्या कुटुंबासह तिथे पोहोचला.