भयावह! जगात होणार मृत्यूचं तांडव, केवळ युरोपमध्ये होतील ५८ लाख मृत्यू, असं असेल कारण, शास्त्रज्ञांनी केली भविष्यवाणी

पृथ्वीवर, मानवजातीवर येणाऱ्या संकटांबाबत, होणाऱ्या विनाशाबाबत शास्त्रज्ञांकडून वेगवेगळी भाकितं करण्यात येत असतात. त्यामधून सावधगिरीचे इशारेही देण्यात येतात. दरम्यान, ग्लोबल वॉर्मिंगवरून तज्ज्ञांनी असाच गंभीर इशारा दिला आहे.
येणाऱ्या काळात ग्लोबल वॉर्मिंग अक्राळविक्राळ रूप धारण करणार असून, त्यामुळे एकट्या युरोपमध्ये ५८ लाख लोकांचा मृत्यू होईल, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. युरोपचं क्षेत्रफळ आणि लोकसंख्या दोन्ही कमी आहेत. अशा परिस्थितीत वातावरणीय बदलांमुळे भारत आणि चीनसारख्या मोठ्या देशात काय परिस्थिती उद्भवू शकते, याचा आपण केवळ अंदाजच वर्तवला जाऊ शकतो.
तज्ज्ञांनी आपल्या संशोधनामधून वातावरणीय बदलांमुळे युरोपमध्ये किती लोकांचा या शतकाअखेरपर्यंत मृत्यू होऊ शकतो याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. तज्ज्ञांच्या मते २०१५ ते २०९९ या काळात तापमान वाढीचा थेट परिणाम होणार आहे. तसेच केवळ वाढत्या गरमीमुळे ५८ लाख लोकांचा मृत्यू होईल. हे संशोधन लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड टॉपिकल मेडिसीनच्या संशोधकांनी केला आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार हा आकडा केवळ वाढत्या तापमानामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आहे. त्यामध्ये आग, पूर, भूकंप, वादळ अशा सर्व नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा जोडला, तर तो अधिकच भयावह असेल. या सर्वांमागे वातावरणीय बदलाशी संबंधित कारणं असतील.
या अभ्यासामध्ये म्हटले आहे की, तापमानामध्ये वाढ झाल्याने थंडीमुळे मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या कमी होईल. मात्र अधिक उष्णता वेगाने लोकांचे बळी घेईल. युरोपमधील बार्सिलोना येथे वाढत्या तापमानामुळे अधिक मृत्यू होतील, असेही या संशोधनामध्ये म्हटले आहे. त्यानंतर रोम, नेप्स आणि माद्रिद येथे मृत्यूचं तांडव होईल.
संशोधकांच्या मते युरोपमधील केवळ १० शहरांमध्येच २३ लाख लोकांचा मृत्यू होईल. म्हणजेच गाव-खेड्यांच्या तुलनेत शहरांमध्ये वातावरणीय बदलांमुळे अधिक मृत्यू होतील.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढत्या तापमानाचा अर्थ थंडीमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये घट होईल असं नाही. नव्याने झालेल्या अध्ययनामध्ये या मांडणीचं खंडन करण्यात आलं आहे. संशोधकांनी सांगितलं की, वाढत्या गरमीमुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा हा थंडीमुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा अधिक असेल. जिथे ग्रीन हाऊस गॅसचं उत्सर्जन अधिक होत असेल, तिथे कार्बन उत्सर्जन अनुकूल बनले नाही तर केवळ युरोपमध्ये गरमीमुळे एकूण ५८ लाख २५ हजार ७८६ अतिरिक्त मृत्यू होतील. संशोधकांनी सांगितले की, वातावरणीय बदलांचा सामना करण्यासाठी तातडीने उपाय करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा ही समस्था अधिकच गंभीर होणार आहे.