video : एक वानर अचानक महिलेच्या अंत्यविधीला आलं, चेहरा पाहिला, नमस्कार केला; लोक म्हणाले, हा तिचा नवरा मारुतीच!
असं म्हणतात की माणसाचा पूर्नजन्म होत असतो. तो कोणत्याही व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या जन्माला येऊ शकतो. पण सायन्स मात्र असं काही मान्य करत नाही. पण चंद्रपूरमध्ये अशी एक घटना घडली आहे ज्यामुळे लोक पूर्नजन्माची चर्चा करू लागले आहे.
एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला अन् तिच्या अंत्ययात्रेला एक वानर तिथं आलं. हे वानर अंत्यविधी होईलपर्यंत सोबत होतं. त्यामुळे गावात चर्चा रंगली आहे.
व्हिडिओ येथे पहा !
वरोरा तालुक्यातील टेंमूर्डा नजीक असलेल्या पिपंळगाव मारुती येथील विजय मारोती धवणे यांच्या मातोश्री अनुसया मारोती धवणे यांचं आज बुधवार दि. 29 जानेवारी रोजी वयाच्या 75 व्या वर्षी वृद्धाप काळाने निधन झालं. आईचं निधन झाल्यामुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. दुपारी सगळे नातेवाईक जमा झाले. अनुसया यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू झाली. अनुसया यांचं पार्थिव स्मशानभूमीत नेत असताना साक्षात हनुमानजीचे रूप समजले जाणारे वानर त्यांच्या घरी अनुसया यांच्या पार्थिवाला न्याहाळून त्यांना नमस्कार केला.
हे वानर स्मशान भूमीपर्यंत पोहचलं. सगळ्यांना वाटलं आता हे वानर तिथून निघून जाईल. पण त्या वानराने मृतदेहाच्या जवळ जाऊन बांगड्या फोडल्या, डोक्यावरील पदर काढला. मृतदेहाला चक्क मिठी मारून डोळ्यावरील चष्मा काढला. तसंच अग्निसंस्कार होईपर्यंत वानर स्मशानभूमीत उपस्थित राहिलं. त्यानंतर ते नातेवाईकांसोबत त्यांच्या घरापर्यंत आले आणि नंतर निघून गेलं.
तसंच नातेवाईक जेव्हा अनुसया यांच्या अस्थी घेण्यासाठी स्मशानभूमीत गेले तेव्हा पुन्हा हे वानर तिथे उपस्थित होतं आणि अस्थी उचलताना सुद्धा ते तिथे आलं. जेव्हा नातेवाईक अस्थी घेऊन घरी आले तेव्हाही हे वानर सोबत आलं. त्यानंतर ते वानर तिथून निघून गेलं. अनुसया यांचे पती मारुती धवणे यांचं 20 वर्षा पूर्वी निधन झालं होतं. त्यांच्या पतीचे नाव मारुती धवणे होतं. आज अनुसया यांच्या अंत्यविधीच्या वेळी बजरंग बलीचे रूप समजले जाणारे वानर मृत्यूनंतर त्यांना भेटायला यणे हा योगायोग की चमत्कार असा प्रश्न उपस्थित सर्वांनाच पडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.