बायकोचं ऐकला नाही, नवऱ्याचा मृत्यू! काही तासातच गेला जीव
![](https://lokshahinews24.com/wp-content/uploads/2025/01/IMG_20250128_161911-780x470.jpg)
लखनऊ : बऱ्याचदा लग्न झाल्यानंतर पुरुषांना चिडवलं जातं की आता तुला बायकोचं सगळं ऐकावं लागेल. ती म्हणेल तसं करावं लागेल. अशा पुरुषांना बायकोचं बैलही म्हटलं जातं. पण बायकोचं ऐकणं किती महत्त्वाचं आहे हे एका प्रकरणातून तुम्हाला समजेल.
बायकोचं ऐकलं नाही म्हणून नवऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
उत्तर प्रदेशच्या मथुरातील हे प्रकरण. कन्हैया नावाची व्यक्ती, जिनं बायकोचं ऐकलं नाही आणि तिचा मृत्यू झाला आगे. 27 वर्षांचा कन्हैया जेवायला बसला होता. जेवणाआधी किंवा काहीही खाण्याआधी हात धुवावेत हे आपल्याला लहानपणापासूनच शिकवलं जातं. कन्हैया हात न धुताच जेवायला बसत होता. त्यावेळी त्याच्या बायकोनं त्याला थांबवलं, आधी हात धुवायला सांगितलं, नंतर जेवायला बसायला सांगितलं. पण कन्हैयाने पत्नीचं ऐकलं नाही. तो तसाच जेवायला बसला.
नंतर घडलं ते धक्कादायक!
रात्रीच्या जेवणानंतर कन्हैयाला अस्वस्थ वाटू लागलं, त्याची प्रकृती झपाट्याने बिघडली. त्याला त्वरीत रुग्णालयात नेण्यात आलं. पण त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने पोलिसांच्या हवाल्याने दिली आहे.
स्टेशन हाऊस ऑफिसर रंजना सचान यांनी सांगितलं की, कन्हैया शनिवारी शेतात कीटकनाशकं शिंपडण्यासाठी गेला होता. त्याच हाताने तो जेवला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.