चिकन खाऊ नका, महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव, पशुसंवर्धन विभागकडून अनेक जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

मुंबईतील उरणमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला होता. त्यानंतर मराठवाड्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. मराठवाड्यातील लातूरनंतर आता नांदेड जिल्ह्यामध्ये देखील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव दिसत आहे.
लोहा तालुक्यातील किवळा येथील मृत कुकुट पक्षांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पशुसंवर्धन विभागकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.
चिकन न खाण्याचा सल्ला
पशुसंवर्धन विभागकडून चिकन न खाण्याचा सल्ला ही देण्यात आला असून अनेक पक्षीची विल्हेवाट लावण्यात येत आहे. मराठवाड्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने लातूर आणि नांदेडमध्ये भीतीचे वातावरण पसरले (Bird Flu in Nanded) आहे.
सर्व नमूने अहवाल पॉझिटिव्ह
लोहा तालुक्यातील किवळा गावातील शेतकरी पंजाब टरके यांच्या मोकळ्या कुकुट पालन केंद्रातील कोंबड्याचे 20 पिल्ले मृत आढळले होते. पशुसंवर्धन विभागामार्फत मृत कुकुट पक्षांचे नमुने पुणे आणि भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. सर्व नमूने अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
565 कुकुटांची विल्हेवाट
मृत कुक्कुट पक्षांना बर्ड फ्लूची लागण झाल्याने किवळा येथील दहा किलोमीटर परिसरात अलर्ट झोन घोषित करण्यात आला आहे. पशुसंवर्धन विभागाकडून खबरदारीची उपाययोजना म्हणून 565 कुकुट ताब्यात घेऊन त्यांची विल्हेवाट लावण्यात आले आहे.
अलर्ट झोन घोषित
जवळपासच्या परिसरात बर्ड फ्लूचा प्रसार होऊ नये, यासाठी किवळा येथील दहा किलो मीटर क्षेत्र अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
अफवा पसरणार नाही
बर्ड फ्लूमुळे भीतीचे वातावरण किंवा अफवा पसरणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जनजागृतीचे उपाययोजना करण्यात आले आहे अशी माहिती पशु संवर्धन अधिकारी राजकुमार पडिले यांनी दिली आहे.