ताज्या बातम्या

पुण्यात नव्या आजाराचं थैमान, लहान मुलांना सर्वात जास्त धोका, 13 रुग्ण व्हेंटीलेटरवर


पुणे: मागील काही दिवसांपासून पुणे शहरात जीबीएस अर्थात गुईलेन बॅरे सिंड्रोमने हाहाकार उडवला आहे. दिवसेंदिवस जीबीएसचे रुग्ण वाढताना दिसत आहेत गुरुवारी जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार पुणे शहारात गुईलेन बॅरे सिंड्रोमची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा 67 वर गेला आहे.

तर 13 जणांना व्हेटींलेटरवर ठेवण्यात आलं आहे. शहरात अचानक वाढलेल्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर या आजाराचं कारण शोधण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विभागाने एक पथक तयार केले आहे.

याबाबत तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सिंड्रोम लहान मुलांमध्ये अधिक वेगानं पसरत आहे. या आजाराने बाधित झालेल्या 67 पैकी 23 रुग्ण हे 19 वर्षाखालील आहे. यात नवजात बालकांपासून शाळकरी मुलांचा समावेश अधिक आहे. तसेच 67 पैकी 16 रुग्ण हे 60 पेक्षा अधिक वय असणारे आहेत. याचाच अर्थ असा की पुण्यात पसरलेला आजार लहान मुलं आणि वयोवृद्धांना मोठ्या प्रमाणात टार्गेट करताना दिसत आहे. ज्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहेत. त्यांच्यात Guillain Barre Syndrome ची गंभीर लक्षणं दिसत असून अनेकांना जागेवरून हालचालही करता येत नसल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

Guillain Barre Syndrome शहरभर कसा पसरला?

दरम्यान, आता पुणेकरांना वेठीस धरणारा Guillain Barre Syndrome शहरभर कसा पसरला? याचं धडकी भरवणारं कारण समोर आलं आहे. पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमची बाधा कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू आणि नोरोव्हायरस या विषाणूमुळे झाल्याचे उघड झाले आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने केलेल्या रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीत हे निष्पन्न झालं आहे.

दूषित अन्न आणि पाण्यातून हे जीवाणू आणि विषाणू पसरत असल्याने पुण्यातील रुग्णांना बाधा झाली, अशी शक्यता राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेनं व्यक्त केली आहे. या दोन्हींचा संसर्ग दूषित अन्न अथवा पाण्यातून होतो. याचबरोबर या दोन्हीची लक्षणेही पोटदुखी, उलट्या आणि जुलाब ही आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button