धार्मिक

किती कोटींची मालकीण आहे ममता कुलकर्णी? वयाच्या 52 व्या वर्षी घेतला संन्यास…


90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी प्रयागराज येथील महाकुंभमध्ये सहभागी होऊन अध्यात्माकडे वळलीज. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्रीने संन्यास घेतला.

 

संन्यास घेतल्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. पण ममता हिने बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली आहे. अभिनेता शाहरुख खान, सलमान खान यांसारख्या अभिनेत्यांसोबत अभिनेत्रीने सिनेमांमध्ये काम केलं आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्रीने लाईमलाईटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. आता ममताने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

 

ममता कुलकर्णी हिची संपत्ती किती?

अनेक वर्षांनंतर भारतात आल्यानंतर ममता हिने स्वतःला ‘योगिनी’च्या रुपात सादर केलं आहे. अभिनेत्रीने संन्यास घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वत्र तिची चर्चा रंगली आहे. अशात ममता हिच्या संपत्तीचा आकडा देखील समोर आला आहे. रिपोर्टनुसार, ममता कुलकर्णी हिच्याकडे 10 मिलियन डॉलर म्हणजे तब्बल 85 कोटी रुपयांची संपत्ती आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

 

ममता कुलकर्णी हिचे वादग्रस्त प्रकरण 1993 मध्ये ममता कुलकर्णी वादाच्या भोवऱ्यात अडकली. अभिनेत्रीने टॉपलेस फोटोशूट केल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकली. ज्यामुळे अभिनेत्रीला सिनेमांमध्ये काम मिळणं देखील बंद झालं होतं. ममता फक्त तिच्या प्रोफेशनल़आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील वादच्या भोवऱ्यात अडकली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यासोबत रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्यानंतर ममता चर्चेत आली. दोघांचे फोटो समोर आल्यामुळे देखील अभिनेत्रीबद्दल अनेक चर्चा रंगू लागल्या.

 

अभिनेत्री ड्रग्स तस्करी प्रकरणात अडकली. 2017 मध्ये ठाणे पोलिसांनी ममता कुलकर्णी आणि ड्रग्ज माफिया विक्की गोस्वामी यांच्याविरुद्ध अंमली पदार्थांच्या 200 कोटी रुपयांच्या तस्करीच्या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. यावर ममताने स्वतःला निर्देष असल्याचं सांगितलं होतं. अभिनेत्री म्हणाली होती, ‘माझ्याकडे जे काही आहे, ते मी बॉलिवूडमध्ये माझ्या मेहनतीने कमावलं आहे.’

 

भारतात परतल्यानंतर ममताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट केला होता. “मी 25 वर्षांनंतर भारतात परतली आहे. 2000 पासून मी भारताबाहेर राहतेय. हा संपूर्ण प्रवास खूपच भावूक होता आणि आता 2024 मध्ये मी पुन्हा . मायदेशी परतली आहे. मला खूप आनंद होत आहे. हा आनंद मला शब्दांत मांडता येत नाहीये,” असं ती या व्हिडीओत म्हणाली होती.

 

ममता कुलकर्णीचे सिनेमे

आता अभिनेत्रीने संन्यास स्वीकारला आहे. पण एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त ममता कुलकर्णी हिचा बोलबाला होता. बॉलिवूडमध्ये सक्रिय असताना अभिनेत्रीने ‘अशांत’, ‘आशिक आवारा’, ‘करण अर्जुन’ आणि ‘वक़्त हमारा है’ या सिनेमांमध्ये काम केलं. अभिनेत्रीवे 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तिरंगा’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आजही अभिनेत्री कोणत्या म कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button