पती थकला अन् बायकोनं दुसराच शोधला, Love ट्राएंगलमध्ये एकाचा मर्डर
पती-पत्नी संबंधांमध्ये किरकोळ कारणांवरून कायमची दरी निर्माण होते. पती-पत्नीमधले संबंध खराब झाल्यानंतर पत्नीने दुसऱ्या पुरुषासोबत संबंध बनवले, यातून एकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात बिठूर गावात राहणाऱ्या आबिद नावाच्या तरुणाचा त्याची पत्नी शबाना हिने तिचा प्रियकर रेहान आणि त्याचा मित्र विकास यांच्या मदतीने गळा दाबून खून केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
आबिद जत्रांमध्ये लोखंडी फिरता पाळणा लावायचा. या व्यवसायात पाळणा लावताना उंचीवरून जमिनीवर पडून त्याच्या मणक्याला जोराचा मार बसला आणि तो अपंग झाला. त्यानंतर पत्नी शबाना काम करून चरितार्थ आणि दवाखान्याचा खर्च चालवत होती. पण याला कंटाळून तिने इन्स्टाग्रामवर रेहान नावाच्या रिक्षाचालक तरुणाशी मैत्री केली. त्यानंतर त्यांचं अफेअर सुरू होऊन शारीरिक संबंध निर्माण झाले. शबानाचा पती आबिद आपल्या संबंधांत आड येत असल्याचं त्या दोघांना जाणवल्यावर रेहानने आबिदचा खून करण्याची कल्पना शबानाला सांगितली.
त्या दोघांनी रेहानचा रिक्षाचालक मित्र विकासची मदत घेऊन आबिदचा काटा काढण्याचं ठरवलं. विकासला नवी रिक्षा खरेदी करायला पैसे हवे होते त्यामुळे तोही कटात सामील व्हायला तयार झाला. शबानाने त्या दोघांना 20 हजार रुपये दिले. शबाना आणि रेहानने आबिदचा खून करण्याचा प्लॅन तयार केला.
सोमवारी मध्यरात्री शबानाने आबिदला खूप दारू पाजली. आबिदला बायकोचे मनसुबे माहीत नव्हते. त्यामुळे तोही भरपूर दारू प्यायला आणि झोपून गेला. शबानाने त्या दोघांना घरी बोलवलं. ती आबिदच्या छातीवर बसली. रेहानने आबिदचे दोन्ही हात पकडले आणि विकासने त्याचा गळा दाबून खून केला. नंतर ते दोघं निघून गेले.
मंगळवारी सकाळी शबानाने जोरजोरात रडून सगळा परिसर डोक्यावर घेतला. शेजारी जमा झाले. त्यांना वाटलं आबिद अति दारू प्यायल्याने मरण पावला असावा. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टेमला पाठवला. पोलिसांना आधीपासून शबानावर संशय होताच; पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आल्यावर त्यांचा संशय सत्यात बदलला. शबानाला पोलिशी खाक्या दाखवल्यावर तिने सगळा गुन्हा कबूल केला, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.