क्रुरतेचा कळस! 5 वर्षीय चिमुकलीवर शेजारील नराधम बाप-लेकाकडून अत्याचार
उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. यात शेजारी राहणाऱ्या बाप लेकाने एका पाच वर्षाच्या मुलीवर लैगिक अत्याचार (Ulhasnagar Crime News) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
अल्पवयीन मुलीच्या शेजारी राहणारे नाराधम हे दोघे बाप लेक हे दोघेजण असल्याची माहिती पुढे आली आहे. तर या पीडित मुलीवर वेळ बदलून लैगिंक अत्याचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. मुलीचे आई वडील कामावर गेल्यावर हे नराधम याचा फायदा घेत मुलीवर अत्याचार करत असल्याची बाब आता समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अल्पवयीन मुलीवर वेळ बदलून लैगिंक अत्याचार
पुढे आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित मुलगी बाथरूमला गेल्यावर तिला त्रास होत होता. दरम्यान या त्रासाबाबत तीने आईला सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत बारा वर्षांचा आरोपी असून दुसरा आरोपी सुनील नंदू पाटोळे आहे या दोघांनीही उल्हासनगर सेंट्रल पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.