पृथ्वीवर सर्वात बुद्धिमान प्राणी कोणते? त्यांची नावं ऐकून चकीत व्हाल ….
प्रथ्वीवर माणूस हा सर्वाधिक बुद्धिमान प्राणी आहे, कारण त्यांच्यात उत्तम तर्कशक्ती असते. माणसांनंतर बुद्धिमान प्राण्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कोणाचा समावेश करावा याबद्दल शास्त्रज्ञांमध्ये काही मतभेद आहेत, तरीही सर्वाधिक बुद्धिमान मानल्या जाणाऱ्या प्राण्यांविषयी काही रंजक माहिती येथे जाणून घेऊया…
कोल्हा : जेव्हा बुद्धिमान प्राण्याचा विषय येतो, तेव्हा कोल्ह्याचे नाव प्रथम येते. मात्र, शास्त्रज्ञांच्या मते तेवढे बुद्धिमान नसतात. अशा स्थितीत, माणसांनंतर जगात सर्वाधिक बुद्धिमान प्राणी कोणता, हा प्रश्न आहे. तसे पाहता, माणूस आणि चिम्पांझी 94% डीएनए सारखेच असतात, हे विज्ञानाने सिद्ध केले आहे.
डाॅल्फिन : माणसांनंतर, असामान्य बुद्धिमत्तेसाठी ओळखला जाणारा सर्वात प्रसिद्ध प्राणी म्हणजे डॉल्फिन. विशेषतः बॉटलनोज डॉल्फिन सामाजिक रचना तयार करण्यात, संवाद साधण्यात आणि त्यांच्या समस्या सोडवण्यात तरबेज असतात. डॉल्फिनच्या बुद्धिमत्तेचा एक मनोरंजक पैलू म्हणजे त्यांची साधने वापरण्याची क्षमता. हे कौशल्य केवळ आत्म-संरक्षणासाठीच नव्हे, तर ते पिढीजात शिकवले आणि हस्तांतरित केले जाऊ शकते.
ऑक्टोपस : प्राण्यांमधील आणखी एक बुद्धिमान आणि हुशार प्राणी म्हणजे ऑक्टोपस. त्यांच्यात अल्पकालीन आणि दीर्घकालीन दोन्ही स्मृती असतात. ते पाण्याखालील चक्रव्यूहातून सहज बाहेर पडू शकतात. ऑक्टोपस अनेकदा खोडकरपणे मच्छिमारांच्या बोटी थांबवतात. ते आपली भूक भागवण्यासाठी खेकड्यांची कवचे सोलून त्यांचे मांसही खाऊ शकतात.
चिम्पांझी : जनुकांच्या रहस्याचा शोध लागण्यापूर्वी, केवळ मानवच अन्न मिळवण्यासाठी यंत्रसामग्री वापरू शकतो, असे मानले जात होते. पण आता असे आढळून आले आहे की, चिम्पांझी हे काम अतिशय उत्तम प्रकारे करू शकतात. चिम्पांझी समाजात राहतात. ते सुंदर सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकतात आणि जोडीदाराचा मृत्यू झाल्यावर दुःख आणि प्रेम व्यक्त करू शकतात. ते माणसांसारखी भाषा शिकू शकत नाहीत, पण सहज संवाद साधू शकतात.
हत्ती : हत्तींमध्ये जमिनीवरील प्राण्यांमध्ये सर्वात मोठा मेंदू असतो. त्यांच्या मेंदूत सुमारे 257 अब्ज न्यूरॉन्स असतात, जे मानवी मेंदूपेक्षा सुमारे तिप्पट जास्त आहेत. हत्तीच्या बुद्धिमत्तेचे एक मनोरंजक वैशिष्ट्य म्हणजे मृत साथीदारांबद्दल शोक करण्याची क्षमता. ते हळूवार स्पर्श करून किंवा कुरवाळून सांत्वन करतात. दूरच्या वस्तू आवाक्यात आणण्यासाठी ते साधनांचा वापर करू शकतात. प्रतिकूल परिस्थितीत नवीन गोष्टी शिकून ते नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करू शकतात.
कावळे : पक्ष्यांमध्ये कावळे सर्वात बुद्धिमान मानले जातात. कावळ्यांचा बुद्ध्यांक (IQ) माणूस आणि माकडांच्या जवळपास असतो. ते अन्न मिळवण्यासाठी विविध वस्तू किंवा साधनांचा वापर करू शकतात. इतकेच नाही, तर कावळे भविष्यातील घटनांचा अंदाजही लावू शकतात, विशेषतः त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी. त्यांची स्मरणशक्तीही खूप चांगली असते. कावळे कोणताही चेहरा ओळखू शकतात. एका संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, कावळे त्यांच्या शत्रूचा चेहरा 17 वर्षे लक्षात ठेवू शकतात.
फक्त माणूसच नव्हे, तर हे प्राणीही असतात विश्वासघातकी, करतात अफेअर अन् पार्टनरला देतात ‘घटस्फोट’, मादीही राहते ‘विधवा’